News Flash

अंडरवॉटर ऑपरेशन्समध्ये माहिर भारताचे एलिट ‘मार्कोस कमांडोज’ पँगाँग लेकजवळ तैनात

मार्कोसना मिळणार खास नवीन बोटी....

पूर्व लडाख सीमेवर पँगाँग सरोवराच्या परिसरात भारतीय नौदलाच्या मरीन कमांडोज म्हणजे मार्कोसची तैनाती करण्यात आली आहे. मार्कोस ही भारतीय नौदलाची एलिट कमांडो फोर्स आहे. पूर्व लडाख भागात भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने आहे. सीमावादावर अजूनही कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही.

मार्कोस अंडरवॉटर म्हणजे पाण्याखालून कुठलही ऑपरेशन करण्यामध्ये पारंगत आहेत. इंडियन एअर फोर्सची गरुड कमांडो फोर्स, भारतीय लष्कराच्या पॅरा स्पेशल फोर्सेस संघर्षाला सुरुवात झाली, त्या पहिल्यादिवसापासून या भागामध्ये तैनात आहेत. आता मार्कोसच्या येण्यामुळे तिन्ही दलाच्या स्पेशल फोर्सेसचे एकत्रीकरण झाले आहे. त्याशिवाय मार्कोस कमांडोजनाही अतिथंड प्रतिकुल वातावरणात ऑपरेशन्सचा एक वेगळा अनुभव मिळेल.

पँगाँग लेक सरोवरात आधीपासून भारताचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. पण आता या मरीन कमांडोजना सहज, सुलभतेने वेगवान हालचाल करता यावी, यासाठी खास नवीन बोटी सुद्धा मिळणार आहेत. या भागात विशेष ऑपरेशन करण्यासाठी लष्कराची पॅरा स्पेशल फोर्स आणि एसएफएफ या कमांडो टीमही आधीपासून कार्यरत आहे. एअर फोर्सचे गरुड कमांडोज इग्ला सिस्टिमसह नियंत्रण रेषेजवळील उंच टेकडयांवर तैनात आहेत. शत्रूचे कुठलेही विमान भारताच्या हवाई हद्दीत घुसल्यास त्यावर इग्ला सिस्टिमधुन लगेच रॉकेट हल्ला करता येतो.

काय आहे मार्कोसचं वैशिष्टय?
मार्कोसकडे स्पेशल ऑपरेशन्सची जबाबदारी दिली जाते. मार्कोसची स्थापना फेब्रुवारी १९८७ मध्ये करण्यात आली. मार्कोस कमांडोज सर्व प्रकारच्या वातावरणात समुद्र, हवा आणि पाणी तिन्ही ठिकाणी ऑपरेशन्स पार पाडण्यासाठी सक्षम आहेत. मार्कोस कमांडोज सर्व ठिकाणच्या मोहिमा पार पाडू शकतात. पण समुद्र मोहिमांमध्ये ते विशेष पारंगत आहेत. १९८७ साली ऑपरेशन पवनतंर्गत मार्कोस कमांडोजनी लिट्टे विरोधात अनेक मोहिमा पार पाडल्यात. १९८८ साली मालदीवमधल्या ऑपरेशन कॅकटसमध्येही मार्कोस कमांडोज सहभागी होते. हेच मार्कोस लडाख पँगाँग टीएसओमध्ये तैनात होणार आहेत.

चीनला पाण्याखालून हल्ल्याची भीती
भारत आणि चीनमध्ये पँगाँग टीएसओच्या परिसरावरुन मुख्य वाद आहे. चीन इथल्या फिंगर फोर भागातून मागे हटायला तयार नाहीय. चीन पँगाँग टीएसओ परिसरातील फक्त भूभागावरच नव्हे, तर पाण्याखालून कुठली हालचाल होऊ नये, यावरही चीन लक्ष ठेवून आहे. भारत पाण्याखालून हल्ला करु शकतो, अशी भीती चीनला वाटतेय. जगभरातील नौदलं ज्या पाणबुडी विरोधी तंत्रज्ञानाचा वापर करतात, त्याचाच वापर चीनकडून सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 11:42 am

Web Title: marcos deployed near pangong lake in eastern ladakh dmp 82
Next Stories
1 अभिनेता रजनीकांत आज मोठी घोषणा करण्याची शक्यता
2 HIV पॉझिटिव्ह व्यक्तीने शरीरसंबंध ठेवणं हत्येचा प्रयत्न ठरत नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय
3 “गुजरातमधील Statue of Unity ला अमेरिकेच्या Statue of Liberty पेक्षा जास्त पसंती”