पत्नीवरील बलात्कार आणि घटस्फोट याबाबत केरळ उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्व निरीक्षण नोंदवलं आहे. विवाहांतर्गत बलात्कार भारतात शिक्षा नसली तरी, त्याच्या आधारावर घटस्फोटासाठी निश्चितपणे दावा केला जाऊ शकतो, असं न्यायमूर्ती ए. मोहम्मद मुस्ताक आणि न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांच्या खंडपीठाने म्हटलं आहे. पत्नीच्या स्वायत्ततेकडे दुर्लक्ष करणारा पतीचा स्वभाव विवाहांतर्गत बलात्कार आहे. मात्र अशा वर्तनाला शिक्षा दिली जाऊ शकत नाही. मात्र असं वर्तन शारीरिक आणि मानसिक छळ आहे. याविरोधात पत्नीने फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी धाव घेतली. त्यानंतर पतीने छळाच्या आधारावर घटस्फोटासाठी अनुमती देणाऱ्या याचिकेविरोधात केरळ हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र केरळ हायकोर्टाने पतीची याचिका फेटाळून लावत फॅमिली कोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे.

“विवाहातील जोडीदारांना समान वागणूक दिली पाहीजे. पतीने पत्नीच्या शरीरावर वर्चस्वाचा दावा करू नये. पत्नीच्या स्वायत्ततेकडे दुर्लक्ष करणारा पतीचा स्वभाव हा विवाहांतर्गत बलात्कार आहे. या वर्तनावर दंड होऊ शकत नाही. तो शारीरिक आणि मानसिक छळाच्या चौकटीत येतो. पतीची पैशाची आणि संभोगाची अतृप्त इच्छा स्त्रीला अडचणीत आणते. घटस्फोट घेण्याच्या हतबलतेत तिने आपले सर्व आर्थिक दावे सोडून दिले आहेत. घटस्फोटासाठी त्या महिलेने १२ वर्षाहून अधिक काल व्यतित केला आहे.” असं मत खंडपीठाने नोंदवलं आहे. यावेळी विवाह कायद्यात सुधारणा करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. याबाबतचं वृत्त लाईव्ह लॉमध्ये देण्यात आलं आहे.

Covovax: लहान मुलांना लस मिळण्यासाठी २०२२ साल उजाडणार! अदर पूनावालांनी केलं जाहीर

पत्नीने आपल्या याचिकेत पतीवर गंभीर आरोप केले आहेत. “आजारी असतानाही पती संभोगासाठी जबरदस्ती करायचा. आईच्या निधनाच्या दिवशीही त्याने असंच कृत्य केलं होतं. त्याचबरोबर अनैसर्गिक संभोग करण्यास प्रवृत्त करायचा. तसेच मुलीसमोर संभोग करण्याची जबरदस्ती केली होती. इतकं सर्व सोसूनही पती माझ्यावर अनैतिक संबंध असल्याचा संशय घ्यायचा.”, असा आरोप पत्नीने केला आहे.

‘तो’ एक मुद्दा ठरतोय अडचणीचा विषय; भाजपा-मनसे युतीसंदर्भात फडणवीसांचं वक्तव्य

पत्नीने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती एक डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत होता. मात्र लग्नानंतर त्याने बांधकाम व्यवसाय करण्यास सुरुवात केली. मात्र या व्यवसायात त्याला अपयश आलं.