भारतीय शेअर बाजारातील घसरणीमुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी व्यक्त केला.
यंदाच्या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला व्यक्त करण्यात आलेल्या विकासाच्या अंदाजानुसार आगामी काळात मान्सूनच्या समाधानकारक प्रमाणामुळे मागणी आणि आर्थिक उलाढाल नक्की वाढेल. त्यामुळे शेअर बाजारही स्थिरावेल. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून लक्षपूर्वकरित्या परिस्थिती हाताळली जात आहे, असे त्यांनी सांगितले.
व्हिडिओ : …अन्यथा देशाची अर्थव्यवस्था अधिक अशक्त होईल – गिरीश कुबेर
जागतिक बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चढ-उतारामुळे देशातील शेअर बाजाराची घसरण झाली. देशाची अर्थव्यवस्था कमकुवत अजिबात नाही. हा चीनमध्ये आलेल्या मंदीच्या लाटेचा परिणाम आहे. जागतिक बाजारपेठेचा आपण भाग असल्यामुळे आपल्यावरही काही प्रमाणात मंदीचा परिणाम हा होणारच. परंतु, ही घसरण जास्त काळ टिकणार नाही, असेही जेटली पुढे म्हणाले.
शेअर बाजारात लक्षणीय घसरण, गुंतवणूकदारांना फटका