प्रियकराबरोबर भांडण झाल्यानंतर संतापाच्या भरात महिलेने प्रियकराचे गुप्तांग कापले. ओदिशाच्या केन्दुझर जिल्ह्यातील बदाउग्गा गावात बुधवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. आरोपी महिला विवाहित असून तिचे अनैतिक संबंध होते. राजेंद्र नायक (२५) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्या कुटुंबियांनी तक्रार नोंदवल्यानंतर शुक्रवारी आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली.
सध्या या युवकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजेंद्र नायक या महिलेच्या घरात असताना ही घटना घडली. भांडण झाल्यानंतर संतापाच्या भरात आपण हे कृत्य केल्याची कबुली महिलेने दिली आहे. गुन्ह्यामध्ये वापरलेले शस्त्र पोलिसांनी जप्त केले आहे. झाराबेडा गावात रहाणारा राजेंद्र नायक चेन्नईत एका खासगी कंपनीत नोकरी करतो.
राजेंद्रने आरोपी महिलेबद्दल एक वक्तव्य केले त्यावरुन दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. राजेंद्र झोपेत असताना महिलेने धारदार शस्त्राने त्याचे गुप्तांग कापले. राजेंद्र नायक गंभीर जखमी झाला आहे. त्याला आधी हरीचंदपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्याला कटक येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 10, 2018 5:20 pm