भारताच्या महत्त्वाकांक्षी मंगळयान मोहिमेचा फक्त नऊ कोटी किलोमीटरचा प्रवास उरला असून लवकरच ते मंगळाच्या कक्षेत पोहोचणार आहे. ‘मार्स ऑरबायटर मिशन’ हे यान ९ कोटी किलोमीटर दूर असून आता ते पृथ्वीपासून १८.९ कोटी किलोमीटर दूर आहे. अजून ३३ दिवसांनी ते मंगळाजवळ पोहोचेल असे इस्रोच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या महिन्याच्या सुरूवातीला इस्रोच्या वैज्ञानिकांनी मंगळयानाचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न करणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला.  हा मार्गबदल ऑगस्टमध्ये केले जाणे अपेक्षित होते. मंगळयानासाठी ४५० कोटी रूपये खर्च आला असून ते आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून पाच नोव्हेंबरला सोडण्यात आले होते. मंगळाच्या वातावरणात २४ सप्टेंबरला ते पोहोचत आहे.