मलेशिया एअरलाइन्ससाठी विमान सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या मुस्लिम महिलांना ‘हिजाब’ (डोके झाकण्यासाठीचे वस्त्र) वापरण्यास परवानगी देण्यात यावी, अशी सूचना  मलेशियाच्या मंत्र्याने केली आहे. विमान सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या प्रत्येक मुस्लिम महिलेला ‘हिजाब’ वापरायचा झाल्यास तशी परवानगी त्यांना देण्यात आली पाहिजे, असे मलेशियाचे क्रीडा आणि युवामंत्री खैरी जमालुद्दीन यांनी स्पष्ट केले. मुस्लिम महिलांसाठी हिजाब धर्मानुसार बंधनकारक आहे. यालाच मलेशियन भाषेत ‘औरत’ असे म्हणतात.