21 October 2020

News Flash

मास्क घालणारे लोक करोनाग्रस्त असतात, डोनाल्ड ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य

ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची चिन्हं

मास्क घालणारे लोक करोनाग्रस्त असतात असं वादग्रस्त वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. मियामी या ठिकाणी एनबीसी न्यूजचा एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात त्यांनी हे भाष्य केलं आहे. खरंतर काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीलाही करोनाची बाधा झाली होती. मात्र यातून ते बाहेर आले. २६ सप्टेंबरला व्हाइट हाउसमध्ये एक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात आलेल्या लोकांमुळे ट्रम्प यांना करोना झाल्याचं म्हटलं जातं आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या बहुतांश लोकांनी मास्क लावले नव्हते. असं असूनही ट्रम्प यांनी आता मास्क घालणाऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

२६ सप्टेंबरच्या कार्यक्रमानंतरच डोनाल्ड ट्रम्प यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या कार्यक्रमात आलेल्या अनेक पाहुण्यांनी मास्क घातले नव्हते. त्यांना याबाबत जेव्हा मियामी येथील कार्यक्रमात विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की सतत मास्क घालणारे लोक करोनाग्रस्त होतात. ट्रम्प यांनी केलेल्या या वक्तव्याला कोणत्याही अधिकृत वैद्यकिय संस्थेने पुष्टि दिलेली नाही. अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केल्याचं दिसून येतं आहे. करोनाबाबत त्यांनी याआधीही अनेक वक्तव्यं केली आहेत हा चायनीज व्हायरस आहे असंही वक्तव्य त्यांनी जानेवारी महिन्यात केलं होतं. आता सतत मास्क घालणारे लोक करोना संक्रमित असतात असं खळबळ उडवून देणारं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं आहे. जनसत्ताने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 3:17 pm

Web Title: mask wearers are always infected says us president donald trump scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 मुलींच्या लग्नाचं योग्य वय किती? सरकार लवकरच निर्णय घेणार; मोदींचं आश्वासन
2 दाऊद इब्राहिमची जमीन १.३८ लाखाला विक्रीस; तुम्हीही घेऊ शकता विकत
3 Bihar Elections: मतांच्या टक्केवारीत भाजपाची जोरदार मुसंडी; ठरला एकमेव राष्ट्रीय पक्ष
Just Now!
X