जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू असतानाच जहाल फुटीरतावादी नेता मसरत आलम याच्या सुटकेचे आदेश जारी करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी स्वत:हून आलमच्या सुटकेचे आदेश दिलेले नाहीत, असे मंगळवारी एका पत्राद्वारे स्पष्ट झाल्याने खळबळ माजली आहे.