03 March 2021

News Flash

अंटार्क्टिकामधील हिमपर्वताचे विभाजन

‘प्राजेक्ट मिडास’च्या संशोधकांनी दिली आहे.

| June 4, 2017 02:59 am

अंटाक्र्टिका खंडातील प्रचंड मोठय़ा हिमपर्वतावर पडलेल्या दरीत मागील सहा दिवसांत १७ किमीने वाढ झाली असल्याची माहिती संशोधकांनी ‘प्राजेक्ट मिडास’च्या संशोधकांनी दिली आहे.

ही दरी अधिक १३ किमीने वाढल्यास या हिमपर्वताचे विभाजन होऊन दक्षिण ध्रुवातील सर्वात मोठय़ा हिमनगाची निर्मिती होणार आहे. लारसन सी हा हिमपर्वतावर असलेली दरी २५ मे ते ३१ मेदरम्यान १७ किमीने वाढली आहे. कोल द्वीपकल्पात या दरीचे उगमस्थान असून आता हिमपर्वताचे विभाजन टाळण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे स्वानसी विदय़ापीठ आणि अॅबर्स्टविद विदय़ापीठातील ‘प्रोजेक्ट मिडास’च्या संशोधकांनी सांगितले. लारसन सी हिमपर्वत ३५० मीटर रुंद असून पश्चिम अंटाक्र्टिकाच्या समुद्रावर तरंगत आहे. या विभाजनामुळे हिमपर्वताचा १० टक्के भाग वेगळा होणार असून यामुळे अंटाक्र्टिका द्वीपकल्पाचे भूदृश्य बदलणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2017 2:59 am

Web Title: massive crack in antarctica ice
Next Stories
1 प्रलंबित नियमांना ‘जीएसटी’ परिषदेची मान्यता
2 मोदी-मॅक्रॉन भेटीत हवामान बदल,दहशतवाद प्रतिबंधावर व्यापक चर्चा
3 भारतीय लष्कराच्या चमूकडून ऑक्सिजन सिलिंडरशिवाय एव्हरेस्ट सर
Just Now!
X