04 March 2021

News Flash

हैदराबादमधील केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट; ८ कर्मचारी गंभीर जखमी

घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन बंब पोहचले

तेलंगणमधील हैदराबादच्या बाहेर असलेल्या औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या परिसरातील बोल्लम येथील एका केमिकल फॅक्टरीत आज भीषण स्फोट झाला. ज्यामध्ये ८ कामगार गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने स्थानिक रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.

याशिवाय, आणखी काही कर्मचारी फॅक्टरीत अडकलेले असण्याची शक्यता देखील स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
ज्या केमिकल फॅक्टरीत हा भाषण स्फोट झाला, त्याचे नाव विंध्य ऑर्गेनिक्स असल्याचे सांगितले जात आहे.

स्फोटानंतर संपूर्ण फॅक्टरीतून मोठ्याप्रमाणावर धूर बाहेर पडत होता. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन बंब पोहचले व आग विझवण्याचे काम सुरू झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 4:08 pm

Web Title: massive explosion at a chemical factory in hyderabad 8 employees seriously injured msr 87
Next Stories
1 लव्ह जिहादच्या अफवेवरुन पोलिसांनी रोखलं लग्न, पण…
2 देशाला जाणून घ्यायचं आहे, ‘राजधर्म’ मोठा की ‘राजहट्ट’? – रणदीप सुरजेवाला
3 “आणखी किती शेतकऱ्यांना बलिदान द्यावं लागेल?”
Just Now!
X