01 March 2021

News Flash

आसामच्या ऑइल इंडिया लिमिटेडच्या गॅस विहिरीला भीषण आग, सिंगापूरहून आले तज्ज्ञ

आकाशात आगीचे लोळ आणि धुराचे लोट

आसामच्या तिनसुकिया या ठिकाणी असलेल्या ऑइल इंडिया गॅसच्या विहिरीला भीषण आग लागली आहे. या आगीचे लोळ आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरले आहेत. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांनी चर्चा केली. त्यांनी या घटनेत काय काय नुकसान झालं आहे ते जाणून घेतलं. तसेच या ठिकाणी मदत आणि बचाव कार्यासाठी NDRF चं पथकही तैनात करण्यात आलं आहे. आसाम सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

आज दुपारच्या सुमारास ही आग लागली. ही आग हळूहळू पसरु लागली आहे. मागच्या १४ दिवसांपासून या विहिरीत गॅस गळती होत होती. त्यामुळेच ही आग लागल्याचं सांगण्यात येतं आहे. एनडीआरएफची टीम मदत आणि बचाव कार्य करत असल्याचं आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी स्पष्ट केलं. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

ही आग नियंत्रणात आणण्यासाठी सिंगापूरहून तज्ज्ञांना बोलवण्यात आलं आहे. गॅसची ही विहीर आसामची राजधाी गुवाहाटी पासून ५०० किमी अंतरावर आहे. भारताच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर आग लागण्याची ही सर्वात भीषण घटना आहे अस प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 6:36 pm

Web Title: massive fire at assams baghjan oil well was leaking gas since may 27 scj 81
Next Stories
1 सुशांत सिंह राजपूतकडे काम केलेल्या मॅनेजरनं १४व्या मजल्यावरून मारली उडी
2 “या तथाकथित व्हर्च्युअल रॅली करोनाचा प्रसार नियंत्रित करणार का?, गमावलेला रोजगार परत आणणार का?”
3 …तर दिल्लीत जुलै महिन्याच्या अखेरीस करोनाचे साडे पाच लाखांहून अधिक रुग्ण असतील
Just Now!
X