News Flash

कोलकात्यात केमिकल फॅक्टरीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे एका केमिकल फॅक्टरीमध्ये भीषण आग

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे एका केमिकल फॅक्टरीमध्ये भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तांगरा परिसरामध्ये ही फॅक्टरी आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सुदैवाने अद्याप कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. तसंच या आगीमध्ये आर्थिक नुकसान किती झालं याचीही अद्याप माहिती मिळालेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तांगरा परिसरातील केमिकल फॅक्टरीमध्ये भीषण आग लागली. काही वेळातच आग संपूर्ण फॅक्टरीत झपाट्याने पसरली. सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या अशून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 7:38 pm

Web Title: massive fire breaks out at a chemical factory in kolkata
Next Stories
1 पिझ्झा देतो सांगत मुलीवर सामूहिक बलात्कार, घरमालकाच्या मुलाला अटक
2 ‘या’ उपकरणामुळे समजणार कसा झाला रेल्वे अपघात
3 बनावट नोटा छापल्या प्रकरणी हॉकी खेळाडूला अटक, मिळाली होती तीन कोटींची ऑर्डर
Just Now!
X