News Flash

पाकिस्तान संसदेच्या घडामोडींवर चायनाची नजर? सभागृहात सापडले चीनी गुप्तचर कॅमेरे

सभापती व उपसभापती निवडण्यासाठी आज सिनेट एक गुप्त मतदान घेणार होते

अध्यक्षपदासाठी मतदान होत असताना शुक्रवारी पाकिस्तान संसदेच्या वरच्या सभागृहात जोरदार गदारोळ झाला. सिनेटच्या सभापती पदासाठी मतदानाची प्रक्रिया सुरू असताना सभागृहात छुपे चीनी गुप्तचर कॅमेरे सापडल्याचे वृत्त आहे. यामुळे अनेक खासदारांनी सिनेटमध्ये गोंधळ घातला आणि मतदानाची प्रक्रिया विस्कळीत झाली. घटनेविषयी अधिक माहितीची प्रतीक्षा केली जात होती.

येथे हे लक्षात घ्यावे लागेल की सभापती व उपसभापती निवडण्यासाठी आज सिनेट एक गुप्त मतदान घेणार होते. यापूर्वी वरच्या सभागृहात ४८ नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली. ज्या जागांवरील विद्यमान खासदार ११ मार्च रोजी निवृत्त होणार आहेत त्याजागांसाठी पाकिस्तानमध्ये ३ मार्च रोजी सिनेट निवडणुका घेण्यात आल्या होत्या. सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक दुपारी किंवा संध्याकाळी होणार असल्याची माहिती सिनेट सचिवालयात देण्यात आली होती.

लोकसभेत विरोधीपक्षासोबत युती असलेल्या पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंट (पीडीएम) ने सभापती पदासाठी पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे माजी पंतप्रधान युसूफ रजा गिलानी आणि जमीअत उलेमा-ए-इस्लाम फजल (जेयूआय-एफ) चे मौलाना गफूर हैद्री यांना उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या सत्ताधारी पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफने (पीटीआय) आपल्या मित्रपक्षांच्या पाठिंब्याने सभापतीपदी सादिक संजरानी आणि उपसभापतीपदी मिर्झा मोहम्मद आफ्रिदी यांची निवड केली आहे.

यापूर्वी इस्लामाबादच्या सर्वसाधारण जागेवर सिनेटचा सदस्य म्हणून गिलानी यांचा विजय हा इम्रान खानसाठी मोठा धक्का होता, कारण त्यांनी स्वत: कॅबिनेटचे सहकारी, पीटीआयचे उमेदवार आणि अर्थमंत्री अब्दुल हफीज शेख यांच्यासाठी प्रचार केला होता. प्रतिस्पर्ध्याच्या १६४ मतांच्या तुलनेत गिलानी यांनी शेखला १६९ मते मिळवून पराभूत केले होते.

पाकिस्तानमध्ये सिनेटच्या सदस्यांची सहा वर्षांची मुदत आहे, त्यापैकी निम्मे दर तीन वर्षानंतर निवृत्त होतात. संसदेचे वरचे सभागृह चालविण्यासाठी दर तीन वर्षांनी नवीन सभापती आणि उपसभापती निवडले जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 6:50 pm

Web Title: massive uproar in pakistan senate after chinese spy cams discovered during voting sbi 84
Next Stories
1 रामदास आठवले यंदा “गो दीदी गो” पावित्र्यात; पश्चिम बंगालमध्ये देणार ममतांना टक्कर
2 २०२१ मध्ये गौतम अदानींची घसघशीत कमाई; जेफ बेझोस, एलन मस्क यांनाही टाकले मागे
3 काँग्रेसचं मिशन प. बंगाल! स्टार कॅम्पेनर्सची यादी जाहीर; सोनिया गांधींसंह ३० जणांचा समावेश!
Just Now!
X