23 January 2021

News Flash

अल्पवयीन मुलानं केला वडिलांचा खून; क्राईम पेट्रोलचे १०० व्हिडिओ पाहून पुरावे केले नष्ट

अकरावीत शिकणाऱ्या या अल्पवयीन मुलानं नियोजनपद्धतीनं केला वडिलांचा खून

प्रातिनिधीक छायाचित्र

एका अल्पवयीन मुलानं स्वतःच्या वडिलांचाच खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मथुरा येथे घडली आहे. विशेष म्हणजे टिव्ही सिरियल क्राईम पेट्रोलचे तब्बल १०० व्हिडिओ पाहून त्याने खूनाचे महत्वाचे पुरावे नष्ट केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.

या घटनेबाबत माहिती देताना मथुराचे पोलीस अधीक्षक उदय मिश्रा म्हणाले, “अकरावीत शिकणाऱ्या या अल्पवयीन मुलानं क्राईम पेट्रोलचे गुन्ह्यांसंबंधीचे जवळपास १०० व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहिले त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने त्याने वडिलांचा खून केला.”

वडील आपल्या बहिणीला घरी वारंवार मारहाण करीत असल्याने चिडलेल्या या मुलाने क्राइम पेट्रोलचे व्हिडिओ पाहून वडिलांना संपवण्याची योजना आखली. मे महिन्यांत लॉकडाउनच्या काळात ही घटना घटला जी आत्ता उघडकीस आली आहे.

खून करताना मुलाने पहिल्यांदा वडिलांच्या डोक्यात रॉडने जोरदार प्रहार केला. त्यानंतर त्याने त्यांचा चेहरा झाकून घेतला आणि त्यानंतर स्वतःच्या हाताने गळा दाबून खून केला. यामुळे त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर आणि मानेवर हाताच्या बोटांचे ठसे उमटले नाहीत. तसेच व्हिडिओ पाहूनच त्याने वडिलांच्या मृतदेहाची विल्हेवाटही लावली.

पोलिसांनी सांगितले की, “या मुलानं युट्यूबवर क्राईम पेट्रोलचे व्हिडिओ पाहून अशा प्रकारे गुन्हा करण्याची योजना आखली आणि महत्वाचे पुरावे नष्ट केले. या मुलाचा फोन तपासल्यानंतर त्यामध्ये क्राईम पेट्रोलचे व्हिडिओ पाहिल्याचे आढळून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 2:01 pm

Web Title: mathura boy kills father removes all traces after watching crime patrol videos over 100 times aau 85
Next Stories
1 मुलीच्या लग्नावर ५०५ कोटी खर्च करणारा भारतीय उद्योगपती झाला दिवाळखोर
2 US Election : वारा, पाऊस, बायडेन अन् प्रचारसभा… साताऱ्याची पुनरावृत्ती अमेरिकेतही होणार?
3 करोना मृत्यू घोषित करताना आरोग्य अधिकाऱ्याने घेतला जोकराचा वेश
Just Now!
X