प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी हे आपल्या पुढच्या कादंबरीसाठी लवकरच भारतात येतील असे संकेत त्यांनी दिले आहेत. सलमान रश्दी हे भारतीय वंशाचे असून सध्या ते न्यूयॉर्कमध्ये असतात. टाईम्स लीट फेस्टमध्ये रविवारी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली.

रश्दी म्हणाले, गेली १० वर्षे पाश्चिमात्य कादंबरी, पुस्तकं लिहिल्यानंतर मी पूर्णपणे भारतीय कादंबरी लिहिण्याच्या विचारात आहे. ज्यासाठी मला भारतात यावं लागेल. २०१२ मध्ये सलग जयपूर फेस्टमधून माघार घेतल्यानंतर भारतीय लिटफेस्टमध्ये पहिल्यांदाच दिसले आहेत.

ताज्या घडामोडींसाठी येथे क्लिक करा…

मी मुंबईत शेवटच्या वेळी सात वर्षांपूर्वी होतो.एकतर धार्मिक आक्षेपांमुळे किंवा सुरक्षा कार्यात अडकल्याने काही वेळा माझं भारतात येणं बंद होण्याची शक्यता होती, खूप अडचणीही येत होत्या. “जर तुमच्यासोबत बंदुका असलेल्या पुरुषांची फौज असेल तर कुलाबा कॉजवेवर तुमच्या मित्रांसोबत कॉफी पिणे शक्य नाही”, असंही त्यांनी हसत हसत म्हटलं आहे.

सलमान रश्दी यांच्या इस्लामवर वादग्रस्त भाष्य करणाऱ्या ‘सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकावर १३ देशांनी बंदी घातली होती. इराणी धर्मगुरूंनी फतवा काढल्याने त्यांना आपली ओळख बदलून देशोदेशी फिरत राहावं लागलं होतं.