News Flash

लष्करप्रमुख नियुक्तीचा मुद्दा निवडणूक आयोगाकडे

भाजपचा विरोध आणि निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही लष्करप्रमुखांच्या नियुक्तीचा मुद्दा केंद्र सरकारने पुढे रेटला आहे. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिफारस करण्यात आली असल्याचे संरक्षण मंत्रालयातर्फे

| May 3, 2014 06:09 am

भाजपचा विरोध आणि निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही लष्करप्रमुखांच्या नियुक्तीचा मुद्दा केंद्र सरकारने पुढे रेटला आहे. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिफारस करण्यात आली असल्याचे संरक्षण मंत्रालयातर्फे शुक्रवारी सांगण्यात आले.
विद्यमान लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग यांची मुदत संपत आहे. या पाश्र्वभूमीवर नव्या लष्करप्रमुखांची नियुक्ती होणे गरजेचे आहे. मात्र, १६ मेनंतर स्थापन होणाऱ्या नव्या सरकारला हा निर्णय घेऊ द्यावा, असे स्पष्ट करत भाजपने केंद्राच्या निर्णयाला आक्षेप घेतला आहे.
या पाश्र्वभूमीवर संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी लष्करप्रमुखांच्या नियुक्तीचा मुद्दा निवडणूक आयोगापुढे सादर केला आहे.
आयोगाने संमती दिली तरच पुढील पावले उचलली जातील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2014 6:09 am

Web Title: may we name the next army chief govt seeks poll panels ok
टॅग : Army Chief
Next Stories
1 निदो हत्याकांड: सीबीआयकडून हत्येचा आरोप मागे
2 अडीच हजार लोक बेपत्ता
3 आसाममधील हिंसाचारास नरेंद्र मोदींचा जातीयवादी प्रचार कारणीभूत
Just Now!
X