गुजरातच्या माजी मंत्री माया कोदनानी यांना २००२ सालच्या नरोडा पाटिया दंगल प्रकरणात जामीन देण्याच्या निर्णयावर गुजरात उच्च न्यायालय ठाम राहिले आह़े  
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने जामिनाला स्थगिती देण्याची केलेली विनंती न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली़
 पथकाचा अर्ज जामीन देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर आल्याचे सांगत न्या़ व्ही़ एम़ साहाय आणि आऱ पी़ ढोलारिया यांच्या खंडपीठाने तो फेटाळून लावला़ या प्रकरणी गुजरात शासनाकडून परवानगी घेऊन कोदनानी यांचा जामीन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे विशेष तपास पथकाचे वकील पी़ जी़ देसाई यांनी सांगितल़े  कोदनानी या नरोडा पाटिया दंगल प्रकरणात जामीन मिळालेल्या पहिल्या गुन्हेगार आहेत़