26 September 2020

News Flash

पोलिसही मॉब लिंचिंगचे बळी; मायावतींचा आरोप

मॉब लिंचिंग एक मोठ्या आजाराप्रमाणे देशात पसरत आहे.

संग्रहित छायाचित्र

मॉब लिंचिंगच्या मुद्द्यावर बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी ट्विटरवरून निशाणा साधला. त्यांनी मॉब लिंचिंगच्या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मॉब लिंचिंग हा भयानक आजार आहे आणि आता पोलिसही त्याचे बळी ठरत असल्याचा आरोप त्यांनी ट्विटरवरून केला.

मॉब लिंचिंग एक मोठ्या आजाराप्रमाणे देशात पसरत आहे. यामध्ये भाजपा सरकारच्या राज्यात कायद्याचे राज्य प्रस्थापित न करण्याची निती आणि धोरण याला कारणीभूत आहे. यामुळे आता केवळ दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांक समाजाचे लोकचं नाही तर सर्व समाजातील लोक आणि पोलिसही याला बळी पडत असल्याचा आरोप मायावती यांनी ट्विटरवरून केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्राने मॉब लिंचिंगवर कायदा करणे आवश्यक होते. परंतु लोकपालाप्रमाणेच मॉब लिंचिंगच्याही प्रकरणात केंद्र सरकार उदासिन असल्याचे दिसत असल्याचे त्या म्हणाल्या.

मायावती यांच्यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी मॉब लिंचिंगवर मोठे वक्तव्य केले होते. दिल्लीत आम्ही राहतो किंवा काम करतो अशा ठिकाणी भितीचे कोणतेही वातावर नाही. परंतु छोट्या गावांमध्ये आणि छोट्या शहरांमध्ये याची भिती अद्यापही कायम आहे. ही भिती प्रत्येक भारतीयाने कमी केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 3:13 pm

Web Title: mayawati commented on mob lynching issue tweeter police jud 87
Next Stories
1 वेतन कपातीच्या मार्गावर काँग्रेस; लोकसभेतील पराभवानंतर आर्थिक चणचण
2 15 ऑक्टोबरपूर्वी कामं पूर्ण करा; केंद्राची अधिकाऱ्यांना डेडलाइन
3 ठरलं! या तारखेला चांद्रयान-२ मोहिमेला होणार सुरुवात
Just Now!
X