इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या युगात फिलिपाइन्समध्ये अधिकाऱ्यांनी महापौरपदाच्या निवडणुकीसाठी नाणफेकीने कौल घेण्याची जुनीच पद्धत अवलंबिण्याचा प्रकार घडला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने तिढा सोडविण्यासाठी नाणेफेकीने कौल घेण्यात आला.चौथ्या वर्गवारीतील महापालिका असलेल्या सॅन तिओडोरमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना तीन हजार २३६ मते मिळाली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नाणेफेकीने कौल घेण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये लिबरल पक्षाच्या माव्‍‌र्हिक फेरारेन यांनी नॅशनलिस्ट पक्षाच्या सॅल्व्हेडोर पी यांचा पराभव केला. या निवडणुकीसाठी पाच वेळा नाणेफेक करण्यात आली त्यामध्ये तीनदा फेरारेन यांनी विजय मिळविला.