कोळसा खाणवाटप घोटाळ्यातील प्रमुख लाभार्थी लोकसभेतील काँग्रेसचे खासदार नवीनजिंदाल यांच्याजिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेडशी संबंधित नकारात्मक बातम्या प्रसिद्ध न करण्याच्या मोबदल्यात १०० कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी तसेच झी बिझनेस वृत्तवाहिनीचे संपादक समीर अहलुवालिया यांची आज दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.
चौधरी आणि अहलुवालिया यांना करण्यात आलेली अटक म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्यावर हल्ला असून केंद्रातील काँग्रेस सरकारच्या दबावाखाली त्यांना अटक करण्यात आल्याचा आरोप झी समूहाच्या वतीने करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज या दोन्ही संपादकांना साकेत येथील न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.
चौधरी आणि अहलुवालिया यांना करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असून त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी, अशी मागणी झी न्यूजच्या वतीने आज मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक अग्रवाल यांनी कॉन्स्टिटय़ूशन क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली. स्वतंत्र भारताच्या ६५ वर्षांंच्या इतिहासात आणीबाणीनंतर प्रथमच प्रसिद्धी माध्यमांची अशा पद्धतीने मुस्कटदाबी करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
नवीनजिंदाल यांनी या न्यायप्रविष्ट प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला. मंगळवारी रात्री चौधरी आणि अहलुवालिया यांना खंडणीखोरीच्या आरोपाखाली गुन्हे शाखेने अटक केली होती. झी समूहाच्या संपादकांना अटक करण्याच्या प्रकाराचा निषेध करताना हा मुद्दा आपण संसदेत उपस्थित करणार असल्याचे जनता दल युनायटेडचे अध्यक्ष शरद यादव यांनी म्हटले आहे. काँग्रेसला ही गळचेपी महागात पडेल, असे भाजपचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटले आहे.नवीनजिंदाल यांच्या जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेडला यूपीए सरकारने कोळसा खाणवाटप घोटाळ्यात सर्वाधिक लाभ पोहोचविताना २५ टक्के कोळसा खाणी बहाल केल्या आणि एकटय़ाजिंदालमुळे सरकारी खजिन्याचे ४५ हजार कोटींचे नुकसान झाल्याचा दावा झी न्यूजने केला आहे. नवीनजिंदाल यांनी झी न्यूजवर दाखविल्या जाणाऱ्या नकारात्मक बातम्या रोखण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले.
िजदाल यांनी आम्हाला लाच देऊ केली. त्याचा परिणाम झाला नाही तेव्हा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंह, छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमण सिंह, झारखंडचे मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्याकडूनजिंदाल यांनी दबाव आणला, एवढेच नव्हे तर सावित्रीजिंदाल यांनी झी समूहाचे प्रवर्तक जवाहर गोयल यांना भेटून चार पिढय़ांच्या कौटुंबिक संबंधांचा हवाला देत भावनिक दडपण आणले. त्यामुळे आम्ही नवीनजिंदाल यांच्या कंपनीशी संबंधित बातम्या थांबवून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचा निर्णय घेतला.जिंदाल यांच्या प्रतिनिधींशी सुधीर चौधरी आणि समीर अहलुवालिया यांची सहा तास चर्चा झाली. झी न्यूजने हा संवाद कधीही नाकारलेला नाही. पण त्यातील पाच मिनिटांचाच भाग दाखवून नवीनजिंदाल यांच्या दबावाने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आम्ही सुरुवातीपासून पोलीस चौकशीत सहकार्य करीत आहोत. त्यामुळे चौधरी आणि अहलुवालिया यांना अटक करणे न्याय्य ठरत नाही, असा युक्तिवाद झीच्या वतीने करण्यात आला.     

काय म्हणते झी?
चौधरी आणि अहलुवालिया यांना करण्यात आलेली अटक म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्यावर हल्ला असून केंद्रातील काँग्रेस सरकारच्या दबावाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे.