News Flash

McAfee च्या संस्थापकाचा मृत्यू; कारागृहात आढळला मृतदेह

स्पॅनिश कोर्टाने अमेरिका प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्यानंतर काही वेळातच जॉन मॅकॅफे यांचा मृतदेह आढळला

McAfee, McAfee Founder John McAfee, Spanish Court, Spain
स्पॅनिश कोर्टाने अमेरिका प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्यानंतर काही वेळातच जॉन मॅकॅफे यांचा मृतदेह आढळला

अँटिव्हायरस सॉफ्टवेअरचे संस्थापक जॉन मॅकॅफे यांचा मृत्यू झाला असून स्पेनमधील कारागृहात त्यांचा मृतदेह आढळला आहे. स्पॅनिश कोर्टाने त्यांच्या अमेरिका प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्यानंतर काही वेळातच मृतदेह आढळला असल्याची माहिती कारागृह अधिकाऱ्याने दिली आहे. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, कर चुकवल्या प्रकरणी जॉन मॅकॅफे अमेरिकेकडून फरार घोषित करण्यात आले होते.

७५ वर्षीय जॉन मॅकॅफे बार्सेलोना येथील जेलमध्ये होते. जॉन मॅकॅफे यांनी आत्महत्या केल्याचा संशय कारागृह अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान प्रवक्त्यांनी याहून अधिक माहिती देण्यास नकार दिला.

जॉन मॅकॅफे यांना ऑक्टोबर २०२० मध्ये बार्सेलोना विमानतळावरुन अटक करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. इस्तंबूलसाठी विमान पकडत असताना त्यांच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात आली होती.

कन्सल्टिंग, क्रिप्टोकरन्सी तसंच आपल्या आयुष्यावरील आधारित कथानकांसाठी हक्क विकत कोट्यावधींची कमाई केल्यानंतरही २०१४ ते २०१८ या काळात त्यांनी जाणुनबुजून कर चुकवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. जर त्यांच्यावरीवल आरोप सिद्ध झाले असते तर त्यांना किमान ३० वर्षांचा कारावास झाला असता.

स्पेनमधील नॅशनल कोर्टाने बुधवारी जॉन मॅकॅफे यांच्या अमेरिका प्रत्यार्पणासाठी परवानगी दिली होती. अमेरिकेने नोव्हेंबरमध्ये प्रत्यार्पणासाठी केलेल्या विनंतीमध्ये मॅकॅफेने चार वर्षांत १० मिलियन युरोज कमावले असून आयकर भरलेला नाही. जॉन मॅकॅफे यांनी १६ जून रोजी ट्वीट करत अमेरिकन प्रशासनाकडे चुकीची माहिती असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी आपली संपत्ती जप्त करण्यात आली असल्याचंही सांगितलं होतं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2021 8:16 am

Web Title: mcafee founder john mcafee found dead in prison after spanish court allows extradition sgy 87
Next Stories
1 माहिती तंत्रज्ञान, माहिती आणि प्रसारण मंत्रालयांना नोटिसा
2 भाजपविरोधी जनआंदोलनात काँग्रेस, शिवसेना, द्रमुकलाही सहभागी करा!
3 ‘पीएनबी’च्या ६० टक्के कर्जावर पाणी!
Just Now!
X