News Flash

परराष्ट्र मंत्रालयाकडून विजय मल्ल्याचा पासपोर्ट रद्द

पासपोर्ट कायदा १९६७ नुसार मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे.

Vijay Mallya loan guarantor : मी आत्तापर्यंत विजय मल्ल्याला कधीच भेटलो नसल्याचा दावा मनमोहन यांनी केला आहे. मल्ल्याला कधी संपर्कही केला नाही आणि ओळखतही नाही. एवढचं काय तर मल्ल्याला मी कधी बघितलेही नाही, असे मनमोहन यांनी सांगितले.

विजय मल्ल्या यांचा पासपोर्ट परराष्ट्र खात्याने रद्द केला असल्याचे वृत्त परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी दिले आहे.
विजय मल्ल्या यांचा पासपोर्ट परराष्ट्र मंत्रालयाने सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) विनंतीवरून रद्द केला आहे. पासपोर्ट कायदा १९६७ नुसार मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ट्विटरवरुन दिली.
यापूर्वी देखील मनी लॉंडरिंगप्रकरणी चौकशी सुरू असलेल्या उद्योगपती विजय मल्ल्या यांचा पासपोर्ट केंद्र सरकारने चार आठवड्यांसाठी स्थगित केला होता. गेल्या महिन्याभरापासून ब्रिटनमध्ये असलेल्या मल्ल्यांवर विविध बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज थकवल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2016 12:45 pm

Web Title: mea revokes vijay mallyas passport
Next Stories
1 पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल- पंतप्रधान
2 बांगलादेशात आयसिसकडून प्राध्यापकाचा गळा चिरून खून
3 भाजप विरोधकांना एकत्र आणण्यात माझी मध्यस्थाची भूमिका – नितीश कुमार
Just Now!
X