सध्याचा जमाना हा प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा आहे. या तिघांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. प्रसारमाध्यमांवर सेन्सॉरशिप लावणे अगदीच अशक्य आहे असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली म्हटले आहे. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

सध्याच्या काळात इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट आणि डिजिटल अशी तिन्ही माध्यमे आहेत. बातमी समाजात पोहचण्यासाठी या तिन्ही मार्गांचा उपयोग वेगाने होतो. त्यामुळे सेन्सॉरशिप लादता येणे केवळ अशक्य आहे. तसेच त्यांच्यावर दबावही आणता येणे शक्य नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटले आहे.