ओट्टो या बुल्डॉग प्रजातीच्या कुत्र्याने स्केटबोर्डवरून तब्बल तीस जणांचा मानवी बोगदा पार करीत ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदवले. पेरू देशातील लिमामध्ये तीन वर्षांच्या ओट्टोने हा विक्रम केला असून, सोशल मीडियावर त्याच्या व्हिडीओला जबरदस्त पसंती मिळाली आहे. कुत्रा माझ्यापेक्षा चांगला स्केटबोर्ड चालवतो, या आशयाच्या प्रतिक्रियाही या व्हिडीओला सोशल मीडियावर मिळाल्या आहेत.