News Flash

लॉकडाउनचा फटका : तेलंगणातील मुख्याध्यापक विकतायत इडली, काही शिक्षक बनले विमा एजंट

शाळा बंद असल्यामुळे शिक्षकांच्या नोकरीवर टाच

लॉकडाउनचा फटका : तेलंगणातील मुख्याध्यापक विकतायत इडली, काही शिक्षक बनले विमा एजंट
आपल्या पत्नीसोबत इडली विकताना रामबाबु

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने मार्च महिन्यापासून संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर केलं. ४ टप्प्यांमध्ये हे लॉकडाउन चालल्यानंतर आता हळुहळु सरकारने काही गोष्टी पुन्हा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. या लॉकडाउनचा फटका देशातील अनेक घटकांना बसला. इतर राज्यात कामासाठी येणारे परप्रांतीय मजूर या लॉकडाउनमध्ये चांगलेच भरडले गेले. याव्यतिरीक्त अनेक उद्योगधंदे ठप्प झाल्यामुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. इतकच नव्हे तर शिक्षण क्षेत्रातही या लॉकडाउनचा फटका बसला आहे. अनेक शिक्षक आणि मुख्याध्यापकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. अचानक रोजगार तुटल्यामुळे आता अनेक शिक्षकांना रस्त्यावर उतरून छोटे-मोठे उद्योगधंदे करावे लागत आहेत.

इंडियन एक्सप्रेसने लॉकडाउनचा फटका बसलेल्या देशभरातील काही शिक्षकांशी संवाद साधून त्यांच्यावर आता काय परिस्थिती ओढावली आहे, याचं वार्तांकन केलं आहे.

 • मारगनी रामबाबु, वय ३६, मुख्याध्यापक
  महिन्याचा पगार – २२ हजार रुपये
  लॉकडाउनमुळे रस्त्यावर इडली विकण्याची वेळ आली

३६ वर्षीय रामबाबु तेलंगणामधील खम्मन येथे एका इंग्रजी शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करत होते. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर शाळेच्या संचालक मंडळाने, शाळा पुन्हा सुरु होईपर्यंत आम्हाला मुख्याध्यापकांची गरज नाही असं सांगितलं. पत्नी, दोन मुलं आणि आई असा परिवार असलेल्या रामबाबुंसमोर अचानक रोजगार तुटल्यामुळे पैशांचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे आपलं घर चालवण्यासाठी रामबाबुयांनी इडली विकण्याचा निर्णय घेतला. “दोन हजार रुपये खर्च करुन मी एक हातगाडी आणली, आता मी आणि पत्नी त्या गाडीवर इडली, डोसा, वडा असे पदार्थ विकतो. दिवसाअखेरीस २०० रुपयांचा फायदा आम्हाला होतो.”

 • रावी बादेती, वय ३०, इंग्रजी शिक्षक
  महिन्याचा पगार – १६ हजार रुपये
  लॉकडाउनमध्ये इन्शुरन्स पॉलिसी विकण्याची वेळ आली

तेलंगणामधील नालगोंडा येथील एका खासगी शाळेत रावी इंग्रजी विजय शिकवतात. “एक दिवस प्रशासनाने जोपर्यंत सांगत नाही, तोपर्यंत कामावर येण्याची गरज नाही असं सांगितलं. माझा एप्रिलचा पगार अद्याप मिळालेला नाही. माझा एक मित्र विमा पॉलिसी विकण्याचं काम करतो, त्याने माझी काही ठिकाणी ओळख करुन दिली. आता मी इन्शुरन्श पॉलिसी विकतो.” रावीच्या परिवारात ६ सदस्य आहेत…महिन्याकाठी त्याला सध्या फक्त ५ हजार रुपये मिळतात…पण एवढ्या मोठ्या परिवाराला सांभाळण्यासाठी एवढे पैसे पुरत नसल्याचंही रावीने सांगितलं.

 • लगनलाल महातो, वय ४०, सोशल सायन्स
  महिन्याचा पगार – ५ हजार रुपये
  स्वतःच्या शेतात काम करण्याची वेळ आली

झारखंडमधील रांची येथील सरस्वती शिशु मंदीर या शाळेत लगनलाल आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सोशल सायन्स शिकवतात. यासाठी त्यांना ५ हजाराचं वेतन मिळतं. मात्र लॉकडाउनमध्ये नोकरी गेल्यानंतर त्यांना आता आपल्या शेतात काम करण्याची वेळ आली आहे. एप्रिल महिन्यापासून पगार मिळाला नाही. “माझ्या परिवारात सहा जणं आहेत. मोठा मुलगा कॉलेजला जातो….ज्या शेतात काम करण्यासाठी मी मजुरांना बोलवायचो तिकडे आता मलाच राबण्याची वेळ आली आहे. पगारच मिळत नाही तर मजुरांना पैसे कुठून देणार??”

 • मुतुक लाल, वय ६८, गणिताचे शिक्षक
  महिन्याचा पगार – ४ हजार ९३०
  मुलाच्या मोबाईल रिपेअरिंग दुकानावर अवलंबून राहण्याची वेळ आली

रांची येथील उच्च विद्यालय शाळेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक मुतुक लाल. सुमारे ५०० विद्यार्थी या शाळेत शिकतात…एप्रिल महिन्यात मुतुक लाल यांना पगाराच्या स्वरुपात ४ हजार ९३० रुपये मिळाले…यानंतर त्यांना घरीच बसावं लागलं आहे. “मुलाचं मोबाईल रिपेअरिंगचं दुकान आहे, आता त्यावरच सर्वांना अवलंबून रहावं लागतं आहे. चहा घेण्याचेही पैसे नाहीयेत. आमची शाळा प्रत्येक विद्यार्थ्याकडून फी च्या स्वरुपात १५० ते २०० रुपये घेतं. पण सध्या लॉकडाउनमध्ये शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थीही फी देत नाहीयेत.” मुतुक लाल यांच्या परिवारात ३ सदस्य आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2020 12:19 pm

Web Title: meet private school principal in telangana forced to sell idli on a cart psd 91
Next Stories
1 करोनावर औषध : भारतात ‘रेमडेसिवीर’चे उत्पादन घेण्यास, विकण्यास दोन कंपन्यांना परवानगी
2 शुन्य डिग्री तापमानात, १८ हजार फुट उंचीवर जवानांची योग प्रात्याक्षिकं
3 अजब शिक्षा : आठवडाभर बेपत्ता असलेल्या महिलेची परतल्यावर पतीला खांद्यावर बसवून धिंड
Just Now!
X