21 September 2020

News Flash

विंग कमांडर पूजा ठाकूर यांनी रचला इतिहास!

मी प्रथम अधिकारी आहे व नंतर महिला आहे, हे उद्गार आहेत विंग कमांडर पूजा ठाकूर यांचे.

| January 26, 2015 09:10 am

941मी प्रथम अधिकारी आहे व नंतर महिला आहे, हे उद्गार आहेत विंग कमांडर पूजा ठाकूर यांचे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे राष्ट्रपती भवन येथे स्वागत करताना त्यांना इंटर सव्‍‌र्हिसेस गार्डच्या दलाने सलामी दिली, त्यात पूजा ठाकूर यांनी नेतृत्व केले. हे पथक भारतीय हवाई दलाच्या इंटर सव्‍‌र्हिसेस गार्ड्सचे होते. त्यांनी ओबामा यांना सलामी दिली. महिलांसाठी सैन्यात काम करणे किती अवघड असते, असे विचारले असता त्या म्हणाल्या, की त्यात काही अवघड नाही. आम्ही प्रथम अधिकारी आहोत, मग पुरुष किंवा स्त्री आहोत. आम्ही सारखेच आहोत, आमचे प्रशिक्षणही सारखेच आहे, आम्ही समान आहोत. ठाकूर या इ.स. २००० मध्ये भारतीय हवाई दलात सामील झाल्या. त्या प्रशासकीय शाखेत काम करीत होत्या. नंतर त्यांची नियुक्ती ‘दिशा’ या प्रशासन सेवेत झाली. तुम्ही बराक ओबामा यांना सलामी देणाऱ्या पथकाचे नेतृत्व करीत आहात, हे ऐकून आईवडिलांना काय वाटले, असे विचारले असता त्या म्हणाल्या, की त्यांना अभिमान वाटला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2015 9:10 am

Web Title: meet puja thakur the officer who led guard of honour for obama
Next Stories
1 राजपथावर ओबामांना भारतीय लष्करी सामर्थ्य आणि संस्कृतीचे दर्शन
2 गुगलकडून डूडलद्वारे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
3 राजपथावर ‘माऊली..माऊली’चा गजर
Just Now!
X