News Flash

“राजघराण्याला बाळाच्या रंगाची चिंता होती”; मेगन मार्कलनं सांगितली ब्रिटीश राजघराण्यातील गुपितं

"माझी जगण्याची इच्छाच नव्हती"

(Joe Pugliese/Harpo Productions via AP, File)

राजघराण्यात असताना आपल्या मनात सतत आत्महत्येचे विचार येत होते असा खुलासा मेगन मार्केलने केला आहे. पती प्रिन्स हॅरीसोबत ओपरा विन्फ्रेला (Oprah Winfrey) दिलेल्या एका मुलाखतीत मेगल मार्केलने राजघराण्याला आपल्या बाळाचा रंग काय असेल याची चिंता होती असंही सांगितलं आहे. आपल्या बाळाच्या रंगासंबंधी राजघराण्यात चर्चा झाली होती अशी माहिती मेगल मार्केलने मुलाखतीत दिली आहे.

मेगनने मुलाखतीत सांगितलं की, “आर्चीच्या जन्माआधी कुटुंबातील सदस्यांची प्रिन्स हॅरीसोबत चर्चा झाली होती, यावेळी त्यांना बाळाचा रंग काय असेल याची चिंता सतावत होती. बाळ जन्माला येईल तेव्हा रंग गोरा नसेल याची चिंता असल्याने राजघराणं त्याला प्रिन्स करण्यासाठी तसंच कोणतीही सुरक्षा पुरवण्यास इच्छुक नव्हतं. हॅरीने कुटुंबीयांनी त्याच्याशी केलेल्या चर्चेची माहिती मला दिली होती”. मेगनने यावेळी ही चर्चा करणाऱ्या कुटुंबातील सदस्याचं नाव उघड करण्यास नकार दिला. नाव उघड करणं त्यांच्यासाठी खूप नुकसान करणारं ठरेल असं मेनने म्हटलं आहे.

मनात आत्महत्येचे विचार येत होते
मेननने यावेळी राजघराण्यात आपण होतो तेव्हा मनात आत्महत्येचे विचार येत होते असा खुलासाही केला आहे. तिने सांगितलं की, “हे त्यावेळीही आणि हॅरीला सांगण्यास मला लाज वाटत होती की….मला अजून जगण्याची इच्छा नव्हती”.

“माझ्या मनात हा एक अगदी स्पष्ट आणि वास्तविक आणि भयानक विचार सतत येत होता. मदतीसाठी मी एका संस्थेत गेली होती. मला मदत मिळवण्यासाठी कुठे तरी गेलं पाहिजे असं मी सांगितलं होतं. याआधी मला असं कधीच वाटलं नसून, कुठेतरी गेलं पाहिजे असं सांगितंल. यावर मी असं करु शकत नाही, हे संस्थेसाठी योग्य नाही असं सांगण्यात आलं,” अशी माहिती मर्कलने दिली आहे. मेगन आणि हॅरी यांनी गतवर्षी राजघराण्याचं सदस्यत्व सोडलं होतं.

खूप एकटेपणा वाटत होता
मेगनने मुलाखतीत सांगितलं की, “राजघराण्याशी जोडलं गेल्यानंतर आपलं स्वातंत्र्य खूप कमी झालं होतं. राजघराण्यामुळे खपू एकटेपणा आला होता. अनेक दिवस आपल्याला एकटेपणा जाणवत होता. याआधी इतका एकटेपणा आपल्याला कधीच जाणवला नव्हता. आपल्याला अनेक नियमांनी बांधून ठेवलं होतं. मित्र-मैत्रीणींसोबत बाहेर लंचसाठी जाण्याची मुभादेखील नव्हती”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 10:28 am

Web Title: meghan markle tells oprah royals fretted about how dark archie skin colour would be sgy 87
Next Stories
1 राफेल कंपनीच्या मालकाचं हेलिकॉप्टर अपघातात निधन
2 मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी
3 राजस्थान : खेड्यातील दारुच्या दुकानावर लागली तब्बल ५१० कोटींची बोली
Just Now!
X