अभिनेतत्री कंगना रणौत नावाभोवती सध्या मोठा वाद घोंगावत आहे. कंगनानं मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी केलेल्या वक्तव्यावरून या वादात तोंड फुटलं होतं. त्यानंतर सातत्यानं आरोप प्रत्यारोप सुरू असून, कंगनावर प्रचंड टीका होत आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर केल्यावरून जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही कंगनावर टीकास्त्र डागलं आहे.

आधी सुशांत सिंह प्रकरणावर आक्रमक झालेल्या कंगना रणौतनं मुंबई पोलिसांचीच भीती वाटते, असं विधान केलं होतं. त्यानंतर मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या दोन्ही वक्तव्यांवरून कंगना टीकाकारांच्या निशाण्यावर आली आहे.

आणखी वाचा- मुंबईत पोहोचताच कंगनाची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत म्हणाली…

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही कंगनाला या विधानावरून टोला लगावला आहे. राज्य पुरस्कृत दडपशाहीनं अडचणीत सापडलेली जम्मू काश्मीरातील घरं बघण्याची विनंतीही मुफ्ती यांनी केली आहे.

“लोकशीहीची हत्या आणि कायद्याच्या राज्याचं उदाहरण म्हणून पाकव्याप्त काश्मीरचा का उल्लेख करायचा? अराजकता आणि राज्य पुरस्कृत दडपशाहीनं अडचणीत सापडलेली जम्मू काश्मीरातील घर पहा. येथे लोकशाहीची फार पूर्वीचं हत्या केली गेली होती,” असं मेहबुवा मुफ्ती यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- कंगनाच्या PoK वक्तव्यावर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आणखी वाचा- “ज्या हातांनी भरवलं ते हात कापायचे नसतात”; स्वरा भास्करचं कंगनाला प्रत्युत्तर

नेमकं काय होतं प्रकरण?

बॉलिवूडमधील ड्रग्ज तस्करीबद्दल कंगनानं विधान केलं होतं. त्यावरून तिला सुरक्षा पुरवण्याची मागणी भाजपाचे आमदार राम कदम यांनी केली होती. मात्र, कदम यांच्या मागणीला नकार देताना कंगनानं मुंबई पोलिसांचीच भीती वाटते, असं विधान केलं होतं. त्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनावर टीका केली. राऊत यांनी धमकी दिल्याचा आरोप करताना कंगनानं मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरसोबतच केली होती. तेव्हापासून कंगना रणौतवर टीकेची झोड उठली आहे.