News Flash

सीमेवर काल झालेल्या जोरदार धुमश्चक्रीनंतर मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या….

दिला हा सल्ला....

संग्रहीत छायाचित्र

सीमेवर काल झालेल्या धुमश्चक्रीनंतर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी भारत-पाकिस्तानला चर्चा सुरु करण्याचा सल्ला दिला आहे. “भारत आणि पाकिस्तान दोघांनी राजकीय अपरिहार्यता बाजूला ठेवून आता चर्चा सुरु करावी. एलओसीच्या दोन्ही बाजूला होणारी जिवीतहानी पाहून वाईट वाटते” असे मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे.

शुक्रवारी पाकिस्तानने जम्मू-काश्मीर सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. सीमेवरील या धुमश्चक्रीमध्ये दोन्ही बाजूला जिवीतहानी झाली. सीमेवरील अशा घटना रोखण्यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी शस्त्रसंधी करार केला होता. तो करार पूर्ववत करावा, अशी मागणी मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे.

पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या गुरेझ ते उरी क्षेत्रातील नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचा शुक्रवारी पुन्हा भंग केला. या हल्ल्यात एका कॅप्टनसह लष्कराचे चार जवान आणि सीमा सुरक्षा दलाचा एक अधिकारी शहीद झाला, तर सहा नागरिकांचा मृत्यू झाला.

पाकिस्तानी हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यात पाकिस्तानचे आठ सैनिक ठार झाले. तसेच पाकिस्तानी लष्कराचे तंबू, खंदक आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाल्याचे दर्शवणारी चित्रफित भारतीय लष्कराने प्रसारित केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2020 7:06 pm

Web Title: mehbooba mufti asks india pak to rise above political compulsion dmp 82
Next Stories
1 बिहार : सुशील मोदींना दिल्लाला बोलावलं; नितीश कुमार यांच्या कॅबिनेवटर भाजपात विचारमंथन!
2 इस्रायलचं इराणमध्ये स्पेशल ऑपरेशन, अल-कायदाच्या नंबर दोनच्या दहशतवाद्याला केलं ठार
3 देशात कोणीही सेक्युलर नाही; स्वत:ला सेक्युलर म्हणाणारे सर्वाधिक धर्मांध : संजय राऊत
Just Now!
X