पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी शनिवारी सायंकाळी राज्यपाल एन. एन. व्होरा यांची भेट घेऊन जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापनेचा दावा केला.
जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल मेहबूबा मुफ्ती यांनी भाजपचे आभार मानले आहेत. शांतता आणि विकास यावरच प्रामुख्याने आपल्या सरकारचा भर राहील, असेही त्या म्हणाल्या. शपथविधी समारंभाचा दिवस लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते निर्मलसिंह यांनीही राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे मेहबूबा मुफ्ती सरकारला पाठिंबा देत असल्याचे पत्र सुपूर्द केले.
खातेवाटपावरून पीडीपी आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले असल्याचे वृत्त निराधार असल्याचे पीडीपीने स्पष्ट केले आहे.
दोन्ही पक्ष एकत्रित चर्चा करून शपथविधी समारंभाचा दिवस ठरवतील, असे पीडीपीचे मुख्य प्रवक्ते नईम अख्तर यांनी सांगितले.