जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांची रवानगी अखेर घरी करण्यात आली आहे. मात्र नजरकैदेतून त्यांची सुटका करण्यात आलेली नाही. श्रीनगर येथे असलेल्या निवासस्थानी मेहबुबा मुफ्ती परतल्या आहेत. मात्र त्यांची नजरकैद कायम आहे.

जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांना सुरक्षेच्या कारणास्तव नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. ५ ऑगस्ट २०१९ रोजी सुरु झालेली त्यांची नजरकैद अजूनही संपलेली नाही. फक्त त्यांची रवानगी त्यांच्या श्रीनगर येथील घरी करण्यात आली आहे. दरम्यान जम्मू काश्मीरचे आणखी दोन माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली आहे. मात्र मेहबुबा मुफ्ती यांची नजरकैद कायम आहे.