News Flash

रक्ताळलेला डोळा… हातावर काळे व्रण; मेहुल चोक्सीचे कोठडीतील फोटो आले समोर

First photo of fugitive diamantaire Mehul Choksi : मेहुल चोक्सीने अँटिग्वातून झाला होता फरार... डोमिनिका सीआयडीने केलं होतं अटक... पोलीस कोठडीतील त्याचे फोटो झाले प्रसिद्ध

मेहुल चोक्सीचा कोठडीतील छायाचित्र. (छायाचित्र। एएनआय)

पंजाब नॅशनल बँकेला मोठा गंडा घालून परदेशात फरार झालेल्या हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचे कस्टठीतील फोटो समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी मेहुल चोक्सीने अँटिग्वातून पोबारा केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्याचा शोध सुरू करण्यात आला होता. डोमिनिकामध्ये चोक्सीला अटक करण्यात आली. तेव्हापासून चोक्सी पोलीस कोठडीत असून, कोठडीतील त्याचे काही फोटोही समोर आले आहेत. यात त्याचा एक डोळा लाल झालेला दिसत असून, हातावरही मोठे काळे व्रण दिसत आहेत.

पंजाब नॅशनल बँकेला मोठा गंडा घालून मेहुल चोक्सी भारतातून फरार झाला होता. त्याला परत आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू असतानाच त्याने बार्बुडानंतर २३ मे रोजी अँटिग्वातून पोबारा केला होता. अँटिग्वातून फरार झालेल्या चोक्सीचा ठिकाणा डोमिनिकामध्ये लागला. स्थानिक सीआयडीने त्याला ताब्यात घेतलं होतं.

चोक्सीला अटक केल्यानंतर त्याचे वकील विजय अग्रवाल यांनी डोमिनिकामधील न्यायालयात धाव घेतली होती. हेबियस कॉर्पर्स याचिका दाखल करत अग्रवाल यांनी मेहुल चोक्सीचा छळ करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्याच्या शरीरावर जखमा असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर पहिल्यांदाच चोक्सीचे तुरूंगाताली फोटो समोर आले असून, त्याच्या शरीरावर जखमा दिसत आहेत. समोर आलेल्या फोटोंमध्ये चोक्सी आजारी असल्यासारखा दिसत आहे. त्याचा एक डोळा लाल झालेला असून, हातावरही काळेनिळे डाग दिसत आहे.

“डोमिनिकामध्ये फक्त दोन मिनिटांसाठी मेहुल चोक्सीला भेटण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी त्याने आपला भयानक अनुभव सांगितला. अँटिग्वा येथील जॉली हार्बर येथून आपलं अपहरण करुन डोमिनिका येथे नेण्यात आल्याचं त्याने सांगितलं. अनेक लोक यावेळी उपस्थित होते,” अशी माहिती विजय अग्रवाल यांनी चोक्सीच्या भेटीनंतर एएनआयला दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 8:32 am

Web Title: mehul choksi in police custody first photo of mehul choksi in police custody in dominica bmh 90
Next Stories
1 ४५ दिवसांतील सर्वांत कमी रुग्णसंख्येची नोंद
2 तृणमूल-केंद्र सरकार संघर्ष पुन्हा तीव्र
3 करोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी केंद्राकडून योजना
Just Now!
X