28 October 2020

News Flash

पीएनबी घोटाळा : मेहुल चोक्सी अमेरिकेत नसल्याची इंटरपोलची माहिती

भारताने याबाबत इंटरपोलच्या वॉश्गिंटन शाखेकडेही चौकशी केली होती. मात्र, मेहुल चोक्सी हा अमेरिकेत नसल्याचे इंटरपोलने भारत सरकारला कळवले आहे.

मेहुल चोक्सी

पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी हे दोघे देश सोडून पळून गेले असून इंटरपोलही त्यांचा शोध घेत आहे. भारताने याबाबत इंटरपोलच्या वॉश्गिंटन शाखेकडेही चौकशी केली होती. मात्र, मेहुल चोक्सी हा अमेरिकेत नसल्याचे इंटरपोलने भारत सरकारला कळवले आहे. सरकारी सुत्रांनुसार, भारताच्या विनंतीवरुन इंटरपोल वॉशिंग्टनने गेल्या बुधवारी ही माहिती दिली आहे.


दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ११ जून रोजी मुंबईतील पीएमएलए कोर्टात फरारी आर्थिक गुन्हेगार अध्यादेशानुसार नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांविरोधात दोन स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. या दोघांची भारत, युके आणि युएईमधील संपत्ती जप्त करण्याची मागणी ईडीने या अर्जाद्वारे केली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, नीरव मोदीला युकेमध्ये कोणताही राजकीय आश्रय नाही. ४७ वर्षीय नीरव मोदी हा युकेमध्ये असल्याचे सांगण्यात येत असून त्याचे प्रत्यार्पण होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात यापूर्वीच अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. तर इंटरपोलनेही नीरव मोदी त्याचा भाऊ निशाल मोदी आणि त्याच्या कंपनीचा व्यवस्थापक सुभाष परब यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीसही काढली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने २८ जून रोजी सांगितले होते की, काही देशांकडे चौकशी केल्यानंतर नीरव मोदीने त्यांच्या देशात प्रवेश केला नसल्याचे भारत सरकारला सांगितले आहे. त्याचबरोबर मंत्रालयाने युरोपीय देश फ्रान्स, युके आणि बेल्जिअम येथील आपल्या कार्यालयाला सांगितले आहे की, नीरव मोदीचा शोध घ्या आणि त्याच्या हालचालींवर निर्बंध घाला.

या वर्षी उघडकीस आलेल्या पीएनबी बँक घोटाळ्यात १३००० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. यामध्ये नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे प्रमुख आरोपी आहेत. त्यांनी बँकेला फसवून कर्जे न फेडताच देशातून पळ काढला आहे. या घोटाळ्यामध्ये बँकेचेही काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 3:49 pm

Web Title: mehul choksi not in us says interpol
Next Stories
1 २ वर्षांच्या मुलीला विकण्याच्या तयारीत असलेल्या आईला ४० वर्षांचा तुरुंगवास
2 हिरव्या झेंडयावर बंदी घाला! सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
3 चीनमध्ये इस्लाम खतरेंमे, 16 वर्षांपर्यंत कुराण शिकवण्यास बंदी
Just Now!
X