News Flash

नवजात मुलीचा जीव वाचवण्यासाठी ब्लड प्लाझ्मा घेऊन चालले होते, पण रस्त्यात कारने धडक दिली आणि….

नवजात मुलीसाठी ब्लड प्लाझ्मा घेऊन जाणाऱ्या कुटुंबाला वेगवान कारची धडक

संग्रहित

नवजात मुलीचा जीव वाचवण्यासाठी ब्लड प्लाझ्मा घेऊन जाणारे एकाच कुटुंबातील तीन सदस्य जखमी झाले आहेत. वेगवान कारने त्यांच्या कारला दिलेल्या धडकेत हे सदस्य जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमधील टिळक मार्गावरील भगवान दास रोडवर हा अपघात झाला. ११ जुलै रोजी हा अपघात झाला. कुटुंबाचा अपघात झाल्याने बाळाला वेळेवर ब्लड प्लाझ्मा मिळू शकला नाही आणि त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी २७ वर्षीय कारचालक शाह वेद शेख याला अटक केली आहे. अपघातानंतर त्याने घटनास्थळावरुन पळ काढला होता. अपघातात शक्ती सिंग, त्यांची पत्नी पुष्पा राणी आणि बहिण जखमी झाले होते. त्यांना तात्काळ राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.

हे ब्लड प्लाझ्मा शक्ती सिंग यांच्या भावाच्या नवजात मुलीसाठी हवं होतं. ४ जुलै रोजी जन्मलेल्या चिमुरीडवर तात्काळ उपचार करणं गरजेचं आहे. लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. शनिवारी रात्री हा अपघात झाला आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी पहाटे पाच वाजता चिमुरडीचा मृत्यू झाला.

कुटुंबीय इंडियन रेड क्रॉस सोसायटी येथून ब्लड प्लाझ्मा घेऊन रुग्णालयात चाललं होतं. याचवेळी रस्त्यात त्यांचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, गाडी पलटी झाली. ब्लड प्लाझ्माचंही नुकसान झालं. यामुळे चिमुरडीला वेळेत ब्लड प्लाझ्मा मिळू शकला नाही आणि तिला आपला जीव गमवावा लागला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 10:43 am

Web Title: members of family carrying blood plasma for a newborn baby injured after the car accident sgy 87
Next Stories
1 बंगल्यात थोडं आणखीन काही दिवस राहू द्या; प्रियंका गांधींनी खरंच केली का मोदींकडे विनंती?
2 देशभरातील करोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ९ लाखांचा टप्पा
3 ट्रॅक्टरमधून स्वतः डॉक्टरच घेऊन गेले करोनाग्रस्ताचा मृतदेह, म्हणाले..”जे केलं ते माझं कर्तव्य”
Just Now!
X