16 January 2018

News Flash

‘ग्रॅमी’वर यंदा पुरुष‘राज’!

ब्रिटिश ऑस्कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बाफ्टा’ पुरस्कारावर यंदा बेन अफ्लेक या अभिनेता दिग्दर्शकाच्या अर्गो चित्रपटाने वर्चस्व राखले. १९८०च्या दशकात इराणमधील कॅनेडीयन दूतावासामध्ये आश्रीत असलेल्या अमेरिकी

लंडन | Updated: February 12, 2013 4:27 AM

ब्रिटिश ऑस्कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बाफ्टा’ पुरस्कारावर यंदा बेन अफ्लेक या अभिनेता दिग्दर्शकाच्या अर्गो चित्रपटाने वर्चस्व राखले. १९८०च्या दशकात इराणमधील कॅनेडीयन दूतावासामध्ये आश्रीत असलेल्या अमेरिकी अधिकाऱ्यांच्या सुटकेचे #नाटय़ रंगविणाऱ्या या चित्रपटाने स्टीव्हन स्पीलबर्गच्या बहुचर्चित लिंकनवर मात करीत सवरेत्कृष्ट चित्रपट, सवरेत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार खिशात घातला. बाफ्टाची १० नामांकने असलेल्या लिंकनला केवळ डॅनियल डे लेविसच्या भूमिकेचे एकमेव पारितोषिक मिळाले. लाइफ ऑफ पाय या चित्रपटाला तांत्रिक गटातील दोन पुरस्कार मिळाले. अर्गोने सवरेत्कृष्ट चित्रपटासाठी ले मिझेराब्ल, लाइफ ऑफ पाय, लिंकन आणि झीरो डार्क थर्टी या चित्रपटांवर बाजी मारली. २४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ऑस्कर पुरस्कारामध्ये अर्गो सवरेत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवितो का, याबाबतचे कुतूहल बाफ्टाच्या निकालाने अधिक वाढले आहे.

First Published on February 12, 2013 4:27 am

Web Title: mens raj on grami this year
  1. No Comments.