येथून जवळच असलेल्या शिवोली येथे एका ४५ वर्षीय मनोरुग्ण मुलाने आपल्या ७५ वर्षीय आईची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.रवी शिरोडकर असे या मुलाचे नाव असून आपली आई नलिनी हिच्या डोक्यात लाकडी फळीने प्रहार करून त्याने रविवारी तिची हत्या केली. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. रवीच्या वडिलांनी आपल्या पत्नीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर रवीला अटक करण्यात आली. याप्रकरणी पुढील पोलीस तपास सुरू आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2013 1:52 am