28 February 2021

News Flash

इंग्लंडमधल्या पहिल्या भारतीय हॉटेलच्या मेनूकार्डचा लिलाव, किंमत वाचून व्हाल थक्क!

मेनू कार्ड हस्तलिखित असल्याचेही समोर

पाटणा येथे वास्तव्य करणाऱ्या सेक देन मोहम्मद यांनी २०० वर्षांपूर्वी लंडन येथील जॉर्ज स्ट्रीटवर एक भारतीय कॉफी हाऊस सुरु केले होते. हिंदुस्थानी कॉफी हाऊस असे या कॉफी हाऊसचे नाव होते. लंडनमध्ये सुरु झालेले हे पहिले भारतीय रेस्तराँ होते. याच कॉफी हाऊसच्या हस्तलिखित मेन्यू कार्डचा लिलाव ८५०० पाऊंड्सना म्हणजेच भारतीय चलनानुसार ७ लाख ५८ हजार ४३० रुपयांना झाला. एखाद्या मेनू कार्डला एवढी मोठी किंमत मिळण्याची ही पहिलीच वेळ असावी. विशेष बाब म्हणजे हे मेनू कार्ड हस्तलिखित आहे. पायनापल पुलाव आणि इतर २५ पदार्थ या मेनू कार्डमध्ये हाताने लिहिण्यात आले आहेत.

१८१० मध्ये हिंदुस्थानी कॉफी हाऊस पोर्टमन स्क्वेअर या ठिकाणी सुरु करण्यात आले. या मेनूकार्डमध्ये चिकन लॉबस्टर, करी, चटणी, ब्रेड अशा अनेक डिशेशचा समावेश आहे. हे रेस्तराँ सुरु करणाऱ्या मोहम्मद यांचा जन्म १७५९ मध्ये बिहारमध्ये झाला. १७८२ पर्यंत मोहम्मद इस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यदलासाठी जेवण तयार करत असे. १७८२ मध्ये मोहम्मद पहिल्यांदा लंडन या ठिकाणी गेला. तिथे त्याने शाम्पू विकण्यास सुरुवात केली ज्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. मोहम्मदने ट्रॅव्हल्स ऑफ डीन मोहम्मद या नावाने एक पुस्तकही लिहिले. हे पुस्तक भारतीय लेखकाने लिहिलेले पहिले इंग्रजी पुस्तक आहे असे मानले जाते. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. त्याने लिहिलेल्या मेनू कार्डला शनिवारी झालेल्या लिलावात ७ लाख ५० हजारांपेक्षा जास्त किंमत आली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 7:57 pm

Web Title: menu from britains oldest indian restaurant dating back to 1810 fetches 8500 at auction
Next Stories
1 २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी जनता दल सेक्युलर आणि काँग्रेसचे हातात हात!
2 भारत आणि चीनने परिपक्वता, हुशारी दाखवल्यामुळे आज सीमेवर शांतता – नरेंद्र मोदी
3 FB बुलेटीन: देशभरातील बळीराजा संपावर, अनुदानित सिलिंडर महागले आणि अन्य बातम्या
Just Now!
X