27 February 2021

News Flash

‘मेरा आधार मेरी पहचान’ : आधारची सुरक्षा निराधार, इंटरनेटवर कार्डधारकांचा तपशील लीक

सोशल मीडियाच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिले

प्रातिनिधीक छायाचित्र

mAadhaar हे अॅप सहज हॅक करणं शक्य असल्याचं दाखवून दोन दिवसांपूर्वीच फ्रेंच सायबर सुरक्षा संशोधकानं UIDAI च्या अॅपमधल्या महत्त्वाच्या त्रुटी दाखवून दिल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच आता आधारमधील नागरिकांची माहिती सहज इंटरनेटवर लीक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘मेरा आधार, मेरी पहचान’ असं गुगलवर सर्च केल्यानंतर काही व्यक्तिंच्या आधारकार्डांचे तपशील समोर येत असल्याचं काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे. यामुळे पुन्हा एकदा आधार कार्डमधील माहितीच्या गोपनीयतेवर शंका उपस्थित झाल्या आहेत.

सोशल मीडियावर काहींनी ट्विट करत अनेक जणांच्या आधार कार्डांचे तपशील काही संकेतस्थळावर दिसत असल्याचं UIDAI च्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘द क्ंविट’ आणि ‘मनी लाइफ’च्या बातमीनुसार ‘mera aadhaar meri pehchan filetype:pdf’ असं गुगलवर सर्च केल्यानंतर काही जणांचे आधार तपशील दिसत आहे. यात आधार धारकाचं नाव, आधार क्रमांक, पालकांचं नाव, पत्ता, जन्म तारीख, छायाचित्र हे तपशील उपलब्ध आहेत. सुदैवानं या कार्डधारकांचे  बायोमेट्रीक्स डिटेल्स उपलब्ध नसल्यानं ही तितकी चिंतेची बाब नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

गुगल सर्चमध्ये ‘mera aadhaar meri pehchan filetype:pdf’ की-वर्ड सर्च केल्यानंतर स्टार कार्ड या वेबसाईटचं नाव प्राधान्य क्रमानं येत असल्याचं ‘मनी लाईफ’नं म्हटलं आहे. यात ज्या आधार कार्डधारकांचे तपशील सुरूवातीला दिसत आहे ते आधार कार्डधारक प्रामुख्यानं उत्तर प्रदेश, बिहारमधले आहेत. स्टार कार्डशिवाय एका सरकारी संकेतस्थळावर तसेच फुटबॉल फेडरेशनच्या संकेतस्थळावरदेखील आधार कार्डचे तपशील उपलब्ध असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे ज्यांच्या आधार कार्डचे तपशील इंटरनेटवर उपलब्ध आहेत त्यांना याची कल्पना आहे का? हे तपशील कसे उपलब्ध झाले? तपशील उपलब्ध करण्याआधी त्यांची परवानगी घेण्यात आली होती का? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहे.

काही दिवसांपूर्वी फ्रेंच सायबर सुरक्षा संशोधक रॉबर्ट बॅपटिस्ट यांनी mAadhaar अॅप हे केवळ एका मिनिटांत हॅक होऊ शकतं असा दावा केला होता. mAadhaar अॅपमध्ये कार्डधारकांचे तपशील उपलब्ध असल्यानं कार्डधारकाला प्रत्येकवेळी स्वत:सोबत कार्ड ठेवण्याची गरज भासत नाही. पण सुरक्षेच्या दृष्टीनं या अॅपची प्रणाली पूर्णपणे फोल असल्याचा दावा करून रॉबर्ट बॅपटिस्ट यांनी ट्विटरवर खळबळ माजवली होती. बँक खाते, मोबाईल तर अन्य सेवांचा लाभ घेण्यासाठी आधारसक्ती सरकारकडून करण्यात आली आहे. त्यातून आधारचे तपशील उपलब्ध असल्यानं आता पुन्हा एकदा आधारच्या सुरक्षेबाबात प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 7:17 pm

Web Title: mera aadhaar meri pehchan detailed profiles of people uploaded online
Next Stories
1 मुकेश अंबानींच्या मुलीशी झालेल्या संवादातून झाला जिओचा जन्म
2 अजब ! अतिरिक्त काम केल्याने ठोठावला अडीच लाखांचा दंड
3 डोंबिवलीकरांनो ‘घाणेरड्या’ शहराला ‘स्वच्छ’ करण्यासाठी एवढं कराच!
Just Now!
X