News Flash

Lockdown : ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सलूनच्या दुकानांना परवानगी

सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणं बंधनकारक

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पर्यंतचा लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवला. करोनामुळे अर्थव्यवस्थेचं गाळात रुतलेलं अर्थचक्र बाहेर काढण्यासाठी केंद्र व राज्य सरकार टप्प्या-टप्प्याने उद्योग धंद्यांना परवानगी देत आहे. ४ मे पासून सुरु होणाऱ्या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सलूनची दुकानं उघडण्यास सशर्त परवानगी देण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं. याव्यतिरीक्त इ-कॉमर्स कंपन्यांनाही या क्षेत्रात अत्यावश्यक सेवा व वस्तूंची विक्री करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये परवानगी देण्यात आलेली असली तरीही सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणं बंधनकारक असल्याचं गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे. रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काय सुरु राहील आणि काय नाही याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने नवी नियमावली जारी केली आहे. ही नियमवामली फक्त काही मर्यादित क्षेत्रात लागू असेल. यानुसार, गृहमंत्रालयाने दारुची दुकानं, पानटपऱ्या, ब्युटी पार्लर आणि सलून उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यासंबंधी काही नियम ठरवण्यात आले आहेत.

दरम्यान केंद्र सरकारने इतर राज्यांत अडकलेल्या मजुरांनाही आपल्या गावी परतण्याची परवानगी दिली आहे. देशातील विविध शहरांत अडकलेल्या मजुरांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडत आहे. महाराष्ट्रातही अद्याप करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होतेच आहे. अद्याप या रोगावर ठोस औषध किंवा लस सापडली नसल्यामुळे नागरिकांनी या काळात अधिकाधिक घरात राहणं गरजेचं असल्याचं आवाहन केंद्र सरकार वारंवार करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 5:25 pm

Web Title: mha allows barber shops sale of non essentials by e commerce platforms in green orange zones psd 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Lockdown : सायकलवरून घरी निघालेल्या कामगाराचा रस्त्यातच मृत्यू
2 करोनावर प्रभावी ठरणारे रेमडेसिविर औषध भारताने मिळवलेच पाहिजे – निर्मल गांगुली
3 राजधानीत करोनाचा कहर, एकाच इमारतीत आढळले ४१ रुग्ण
Just Now!
X