२०१६-१७ आर्थिक वर्षात केंद्रीय गृह मंत्रालयासाठी ७७ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी मोठा निधी हा सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्यासाठीच देण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत पुढील आर्थिक वर्षांसाठीच्या तरतुदी २४.५६ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयासाठी ७७३८३.१२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी ६७४०८.१२ कोटी हे अनियोजित खर्च असून, ९९७५ कोटी रुपये नियोजित खर्च असणार आहे. एकूण तरतुदीपैकी ५०१७६.४५ कोटी रुपये सात निमलष्करी दलांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक १६२२८ कोटी रुपये केंद्रीय राखीव पोलीस दलाला मिळणार आहेत.