News Flash

निमलष्करी दलांची दारं तृतीयपंथीयांसाठी उघडावी का? केंद्र सरकारनं केली विचारणा

तृतीयपंथीयांना निमलष्करी दलात घेण्यासंदर्भात सरकारकडून चाचपणी

निमलष्करी दलांमध्ये मोठा सामाजिक बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं या दिशेनं पाऊल टाकलं असून, लष्कर व निमलष्करी दलात तृतीयपंथीय व्यक्तींना लष्कराच्या अधिकारी पदावर नियुक्त करण्यासंदर्भात विचारणा केली आहे. केंद्र सरकारनं देशातील निमलष्करी दल दलांना याविषयी भूमिका मांडण्यास सांगण्यात आलं आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयानं १ जुलै रोजी यासंदर्भात पत्र पाठवलं आहे. केंद्रीय निमलष्करी दलांमधील सहाय्यक कमांडट पदासाठीच्या परीक्षेच्या नियमात महिला, पुरुष व तृतीय पंथीयांचा समावेश करण्यासंदर्भात अभिप्राय मागवले होते. मात्र, त्यावर निमलष्करी दलांकडून कोणतीही प्रतिक्रिया न आल्यानं गृह मंत्रालयानं पुन्हा स्मरण करून दिलं आहे. केंद्रीय लष्करी पोलीस दलांमधील सहाय्यक कमांडट पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या नियमांमध्ये बदल करून महिला, पुरुष यांच्यासोबत तृतीयपंथी व्यक्तीचा समावेश करण्याविषयी विचारणा करण्यात आली होती. त्यावर अद्याप पर्यंत सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी व सीआयएसएफकडून कोणतीही भूमिका मांडण्यात आलेली नाही. या मुद्याचा विचार करून केंद्रीय गृह मंत्रालयाला २ जुलैपर्यंत सकारात्मक अंतिम अभिप्राय द्यावा, असं मंत्रालयानं या पत्रात म्हटलं आहे.

निमलष्करी दलांमधील लष्करी पदावर तृतीयपंथी व्यक्तींना घेण्यासंदर्भात सरकारकडून चाचपणी सुरू असल्याच या पत्रावरून दिसून येत आहे. सरकारनं यासंदर्भात निर्णय घेतल्यास निमलष्करी दलांमध्ये महिला व पुरुष अधिकाऱ्यांबरोबर निमलष्करी अधिकाऱ्यांचाही समावेश होईल. सध्या लष्कर व निमलष्करी दलात तृतीयपंथीयांची भरती केली जात नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 7:28 pm

Web Title: mha seeks views of paramilitary forces on recruiting transgenders as officers bmh 90
Next Stories
1 “प्रियंका गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भाजपा सरकार भेदरले”
2 ‘त्या’ विदेशी तबलिगींना तोपर्यंत व्हिसा नाही; सरकारचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
3 …तर अनिल अंबानी जाऊ शकतात तुरूंगात; माहिती देण्याची तारीख आली जवळ
Just Now!
X