अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल आणि माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्लू बुश यांच्या भेटीचा एक क्षण सध्या सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल होत आहे. अमेरिकेतील एका राष्ट्रीय संग्रहालयाच्या उदघाटन समारंभामध्ये मिशेल ओबामा यांनी बूश यांची गळाभेट घेतली होती. मिशेल लोकांना भेटण्याचा छंद असणाऱ्या मिशेल यांनी बुश यांची घेतलेल्या या भेटीचा फोटो सध्या सोशल नेटवर्कींग साइटवर व्हायरल होत आहे. अमेरिकेमध्ये सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कलाकृतीचे दर्शन घडविण्यासाठी एक संग्रहालय सुरु करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये मिशेल आणि बराक ओबामा यांनी उपस्थिती लावली होती. मिशेल यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येताच व्यासपीठावर उभ्या असणाऱ्या अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांची गळाभेट घेतली होती. या कार्यक्रमामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन देखील उपस्थित होते.

यावेळी बराक ओबामा आणि जॉर्ज डब्लू बूश यांनी अमेरिकन जनतेला संबोधित केले. ‘कोणताही महान देश आपला इतिहास लपवून ठेवत नाही.’ असे सांगत बुश यांनी या संग्रहालयातील वस्तू देशाचे वैभव असल्याचे म्हटले होते. अशी माहिती अमेरिकन प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केली होती.  या संग्रहालयामध्ये ३ हजाराहून अधिक कलाकृती ठेवण्यात आल्या होत्या.

यापूर्वी बराक ओबामा यांची नक्कल करणारा मिशेल यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांनी आपली मुलगी ज्यावेळी बराक ओबामांना प्रश्न विचारते तेंव्हा आपले पती कशी प्रतिक्रिया देतात, याची नक्कल करताना मिशेल दिसल्या होत्या. तसेच काही दिवसांपूर्वी बराक ओबामा यांचा १०६ वर्षांच्या महिलेच्या नृत्याचा व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.