27 September 2020

News Flash

IVF तंत्राने झाला माझ्या मुलींचा जन्म-मिशेल ओबामा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही कधीच माफ करणार नाही असेही मिशेल ओबामा यांनी म्हटले आहे

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या पत्नीने म्हणजेच मिशेल ओबामाने त्यांच्या आयुष्यातले एक गुपित उघड केले आहे. २० वर्षांपूर्वी जेव्हा गर्भपात झाला होता तेव्हा मी खूप निराश आणि वैफल्यग्रस्त झाले होते. त्यानंतर IVF तंत्राने माझ्या दोन मुलींचा जन्म झाला असे मिशेल ओबामा यांनी म्हटले आहे. बराक आणि मिशेल यांना दोन मुली आहेत मालिया आणि साशा अशी त्यांची नावे आहेत. या दोघींचाही जन्म IVF तंत्राने झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मिशेल ओबामा यांनी बिकमिंग नावाचे पुस्तक लिहिले आहे. ज्याचे प्रकाशन आज होणार आहे. ४२६ पानांच्या पुस्तकात मिशेल ओबामांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. इतकेच नाही तर व्हाईट हाऊसमधली आठ वर्षे कशी होती? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची पत्नी म्हणून त्यांना काय वाटलं हे सगळंही या पुस्तकात त्यांनी कथन केलं आहे.

याआधी त्यांनी याच पुस्तकाच्या औचित्याने अमेरिकेचे न्यूज चॅनल एबीसीला मुलाखत दिली. या मुलाखतीत जुन्या काही आठवणीही कथन केल्या. यावेळी बोलताना मिशेल म्हटल्या, २० वर्षांपूर्वी जेव्हा माझा गर्भपात झाला तेव्हा मला वाटले की आता मी कधी आईच होऊ शकणार नाही. मी अपयशी ठरले आहे. गर्भपात होऊ शकतो त्यात विशेष बाब नाही हे मला तेव्हा ठाऊक नव्हते. मात्र तो अनुभव मला अत्यंत निराश आणि वैफल्यग्रस्त करणारा ठरला असेही मिशेल ओबामा यांनी म्हटले आहे. ५४ वर्षीय मिशेल ओबामांनी हे स्पष्ट केले की त्यांच्या दोन्ही मुलींचा जन्म आयव्हीएफ तंत्राने झाला आहे. बराक आणि मिशेल या दोघांची मुलगी मालिया ही २० वर्षांची आहे तर साशा १७ वर्षांची आहे.

मिशेल ओबामा यांच्या पुस्तकात डोनाल्ड ट्रंप यांचाही उल्लेख आहे. त्यांना मी कधीही माफ करणार नाही असे मिशेल ओबामांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बराक ओबामांबाबत अनेक अफवा पसरवल्या. ओबामांचा जन्म अमेरिकेत झाला नव्हता असेही त्यांनी म्हटलं होतं. मात्र त्यांच्या या खोट्या वक्तव्यासाठी मी त्यांना क्षमा करणार नाही असेही मिशेल ओबामा यांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली वक्तव्ये बिनबुडाची आणि बेजबाबदार आहेत त्यामुळे मी त्यांना माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे मिशेल यांनी म्हटले आहे.

 

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2018 1:00 pm

Web Title: michelle obama reveals she suffered a miscarriage 20 years ago as she says she and barack had to do ivf to conceive daughters
Next Stories
1 आझमगढची निर्मिती योगी आदित्यनाथांच्या बापाने केली नाही-अबू आझमी
2 आरोपी स्वत:च्या खटल्यातील न्यायाधीश होऊ शकत नाही; काँग्रेसचे प्रत्युत्तर
3 ‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’
Just Now!
X