जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर निर्मात्या मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने सत्या नाडेला यांची कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय वंशाचे नाडेला गेली ७ वर्षे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. कंपनीने त्यांच्या नेतृत्वातखाली नवीन उंची गाठली आणि आता त्यांना त्याचे आता बक्षीसच मिळाले आहे. नाडेला जॉन थॉमसन यांची जागा घेणार आहेत. तर जॉन थॉमसन पुन्हा एकदा लीड इंडिपेंडेंट डायरेक्टरच्या भूमिकेत परतणार आहे. थॉमसन यांना २०१४ साली अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्याआधी ते कंपनीच्या बोर्डात स्वतंत्र संचालक होते.

५३ वर्षीय नाडेला यांची २०१४ मध्ये मायक्रोसॉफ्टचा मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणुक करण्यात आली होती. जेव्हा त्यांनी हे पद सांभाळले तेव्हा कंपनी समोर मोठ्या प्रमाणात संकटं निर्माण झाली होती. नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टला केवळ या संकटांतून बाहेर काढले नाही तर नवीन उंचीवर नेले. ऑफिस सॉफ्टवेअर फ्रँचायझीला पुनरुज्जीवित करताना क्लाउड कंप्यूटिंग, मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर त्यांनी लक्ष केंद्रित केले.

layoffs in 2024 leading it companies cutting jobs in year 2024
‘आयटी’ कंपन्यांच्या मनुष्यबळात घट; देशातील आघाडीच्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रोचा समावेश
central government, appoints manoj panda
वित्त आयोगाच्या सदस्यपदी अर्थतज्ज्ञ मनोज पांडा, डॉ. निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागी निवड
Amit Kalyani Reappointed as Vice Chairman and MD of Bharat Forge
भारत फोर्जच्या उपाध्यक्षपदी अमित कल्याणींची पुनर्नियुक्ती
Why stress test of mutual fund is important
तुमच्या म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट काय सांगते? म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट महत्त्वाची का?

हे ही वाचा >>“भारतातील सध्याची परिस्थिती वाईट”; मायक्रोसॉफ्टच्या सत्या नाडेलांची CAA वर नाराजी

कंपनीच्या शेअरच्या किंमतीत सात पटींनी वाढ

नाडेला यांच्या कार्यकाळात मायक्रोसॉफ्टच्या शेअर्सची किंमत सातपटीहून अधिक वाढली आणि कंपनीची मार्केट कॅप २ ट्रिलियन डॉलरच्या जवळ पोहोचली. नाडेला हे कंपनीचे तिसरे अध्यक्ष होतील. यापूर्वी बिल गेट्स आणि थॉमसन कंपनीचे अध्यक्ष होते. नाडेलांपूर्वी स्टीव्ह बाल्मर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. थॉमसन हे स्वतंत्र स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत राहतील आणि नाडेला यांच्या भरपाई, यशाचे नियोजन, प्रशासन आणि बोर्ड कार्यांची देखरेख करतील, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

हे ही वाचा >> ‘भारतातील स्थिती भयकारी, हृदयद्रावक…’

हैद्राबाद येथे शिक्षण

सत्या नाडेला यांचा जन्म हैदराबादमध्ये झाला आणि सुरुवातीचे शिक्षण त्यांनी तिथेच घेतले. त्यानंतर त्यांनी मनिपाल विद्यापीठातून आयटी अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स आणि शिकागो विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले.१९९२ मध्ये ते मायक्रोसॉफ्टमध्ये दाखल झाले. मायक्रोसॉफ्टमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी सन मायक्रोसिस्टममध्ये काम केले होते.

२००० मध्ये मायक्रोसॉफ्ट सेंट्रलचे ते उपाध्यक्ष झाले, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट बिझनेस सोल्यूशन्सचे कॉर्पोरेट उपाध्यक्ष झाले, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष  पदी नियुक्ती झाली.