News Flash

भारतासाठी ‘आधार’शी संलग्न स्काईप लाईट सेवा लाँच, सत्या नाडेला यांची घोषणा

कुशल कारागीरांना रोजगार मिळवून देणार

microsoft, skype light, satya nadella
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी भारतासाठी स्काईप लाइट सुविधेचा शुभारंभ केला.

मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी भारतीयांसाठी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. भारतासाठी आधारशी संलग्न स्काईप लाईट या सेवेचा शुभारंभ करण्यात आला असून याशिवाय प्रोजेक्ट संगम हा उपक्रमही सुरु करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कुशल कारागीरांना रोजगार मिळवून दिला जाईल असे नाडेला यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल इंडियाचा नारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर माय्रकोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्या भारत दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. बुधवारी नाडेला यांनी भारतातासाठी मायक्रोसॉफ्टतर्फे नवीन घोषणा केल्या. भारतातील कंपन्यांसाठी क्लाऊड कॉम्प्यूटींग सुविधेची माहिती त्यांनी दिली. याशिवाय भारतासाठी स्काईप लाईट ही सुविधा सुरु करण्यात येणार असून ही सुविधा आधारशी संलग्न असेल अशी माहिती त्यांनी दिली. तसेच भारतासाठी लिंक्डइन लाईट हे व्हर्जनही भारतात सुरु केले जाणार आहे. प्रॉजेक्ट संगम हा उपक्रमही त्यांनी सुरु केल्याचे सांगितले. भारताच्या आर्थिक व्यवस्थेमध्येही डिजिटल क्रांती होत असून स्टेट बँक ऑफ इंडियानेही आता क्लाऊडची मदत घेतली आहे. बँकेचे ३६५ कार्यालय क्लाऊड सुविधेशी जोडल्याचे त्यांनी सांगितले. आंध्रप्रदेशने नागरी सुविधेसाठी मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊडचा आधार घेतल्याचे त्यांनी सांगितले. नाडेला यांनी ९९डॉट्स या उपक्रमाचीही माहिती दिली. या उपक्रमामुळे डॉक्टरांना क्षयरोग झालेल्या रुग्णांशी संवाद साधणे सोपे झाल्याचे ते म्हणालेत.

भारत दौ-यात नाडेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचीही भेट घेतली. आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रातील सहकार्याविषयी त्यांनी चर्चा केली. याशिवाय निती आयोगाच्या चर्चासत्रात त्यांनी सहभाग घेतला होता. सुशासनासाठी क्लाऊड कॉम्प्यूटींगचा वापर यावरही नाडेला यांनी मार्गदर्शन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2017 12:23 pm

Web Title: microsoft ceo satya nadella future decoded 2017 major india centric announcements event in mumbai update
Next Stories
1 शेतकरी आत्महत्या करतात आणि मल्ल्या पैसे घेऊन पळतो, वरुण गांधींचा घरचा आहेर
2 2005 Delhi serial blasts: ‘पोलीस आमच्या तोंडात विष्ठा कोंबायचे आणि चपातीबरोबर गिळायला लावायचे’
3 जनमतावर आधारित वृत्तांकन हा अवमान नव्हे!
Just Now!
X