News Flash

हवाई दलाचे लढाऊ विमान मिग-२७ कोसळले, पायलट सुखरुप

विमानाचा पायलट बचावला असून तो सुखरुप असल्याचे सुत्रांकडून कळते.

जोधपूर : हवाई दलाचे मिग २७ लढाऊ विमान राजस्थानातील जोधपूर जवळ कोसळले.

भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान मिग-२७ युपीजी हे राजस्थानातील जोधपूरजवळ कोसळल्याचे वृत्त आहे. आज (दि.३१) सकाळी नेहमीच्या सरावादरम्यान उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते मोकळ्या जागेत कोसळले. दरम्यान, विमानाचा पायलट बचावला असून तो सुखरुप असल्याचे सुत्रांकडून कळते.

जोधपूरच्या सिरोही जिल्ह्यातील शिवगंज तालुक्यातील ओडाना गावात ही दुर्घटना घडली. आपल्या दैनंदिन सारावासाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळानंतर पायलटचे विमानावरील नियंत्रण सुटल्याने हे विमान कोसळल्याचे माध्यमांतील वृत्तातून सांगण्यात येत आहे. दरम्यान, पायलटने पॅराशूटच्या माध्यमातून बाहेर उडी घेतल्याने तो सुखरुप बचावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2019 1:12 pm

Web Title: mig 27 upg aircraft on a routine mission crashed this morning at rajasthans jodhpur
Next Stories
1 ठरलं! राहुल गांधी दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार
2 पंजाब: औषध परवाना रद्द, महिला आरोग्य अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या
3 आर्थिक वर्षाचा आजचा शेवटचा दिवस; उद्यापासून होणार हे महत्वाचे बदल
Just Now!
X