गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील लालपर्दा गावाजवळ मिग-२९ हे लढाऊ विमान सोमवारी दुपारी कोसळले. विमान कोसळणार असल्याचे लक्षात येताच वैमानिकाने त्यातून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱयांनी ही माहिती दिली.
विमानाने नेहमीच्या सरावासाठी उड्डाण केले होते. दुपारी दीडच्या सुमारास लालपर्दा गावाजवळ विमानात बिघाड झाल्यामुळे ते कोसळले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश हवाई दलाने दिले असून, त्यासाठी नेमलेले पथक लवकरच घटनास्थळाला भेट देणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 24, 2013 4:46 am