सध्या संपूर्ण देशात करोना व्हायरसमुळे भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. करोनाचा वाढता संसर्ग थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी घोषीत केलेल्या लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु आहे. त्यामुळे अनेकजण वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. अनेक स्थालांतरित कामगारांनी आपपल्या राज्यात परत जाण्याचा मार्ग निवडला आहे. मात्र लॉकडाउनमुळे सार्वजनिक सेवा बंद असल्यामुळे अनेक कामगारांनी पायी चालत जाण्याचा निर्यण घेतला आहे. या स्थलांतरित कामगारांचे प्रवासादरम्यानेच अनेक हृदयद्रावर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक कामगार त्याच्या आजारी मुलाला नेताना दिसत आहे.

गेल्या १५ दिवसांपासून हे कामागर चालत प्रवास करत होते. सुप्रिया भारद्वाज यांनी सोशल मीडियावर ट्विट करत याची माहिती दिली आहे. त्यांनी या कामगरांचा व्हिडीओ शेअर करत ‘हे कामगार गेल्या १५ दिवसांपासून चालत निघाले आहेत. त्यांना मध्य प्रदेशात पोहोचायचे आहे. त्यांच्या मुलाला लागले आहे. खाटेवर त्या मुलाला झोपवून ती खाट ते रस्सीने बांधली आहे आणि आता ती खांद्यावर उचलून घेत हे कामगार निघाले आहेत आहेत. ते कुटुंबीयांसोबत निघाले आहेत’ असे त्यांनी व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिले आहे.

‘वन इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार हा कामगार मध्य प्रदेशमधील सिंगरौली गावचा रहिवासी आहे. तो लुधियाना यथे काम करत होता आणि तेथेच परिवारासोबत राहत होता. लॉकडाउनमुळे तो काम करत असलेली फॅक्ट्री बंद पडली. त्यामुळे तो त्याच्या इतर कामगार मित्रांसोबत पायीच घरी जाण्यास निघाला. दरम्यान त्याचा १५ वर्षांचा मुलगा आजारी होता. माने जवळील भागात दुखापत झाल्यामुळे त्याला चालत जाणे कठिण होते. त्यामुळे त्याने त्याला खाटेवर झोपवले आणि त्या खाटेला रस्सीने बांधले. आता ती खाट कामगार खांद्यावर घेऊन निघाला आहे. जवळपास त्यांनी ५० किलोमिटरचा प्रवास केला आहे.

शुक्रवारी रामादेवी महामार्गाजवळ पोहोचताच त्यांना जेवण देण्यात आले. त्यानंतर त्यांची घरी जाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली. देशात मार्च महिन्याच्या शेवटी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर अनेक कामगार मिळेल त्या वाहनाने किंवा पायी आपल्या मूळगावी परतताना दिसत आहेत. या कामगारांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.