राजधानी दिल्लीसह चेन्नई आणि पूर्व व उत्तर भारतात बुधवारी रात्री भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर मापकावर तो ५.६ इतका नोंदला गेला असून या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्त हानी ओढवल्याचे रात्री उशीरापर्यंत कळलेले नाही.
या भूकंपाचा केंद्रबिंदू बंगालच्या उपसागरात होता. रात्री ९ वाजून ५२ मिनिटांनी झालेल्या या भूकंपाचे धक्के काही सेकंदांपर्यंत जाणवत होते.
बिहारमध्ये पाटणा, पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यासह काही भागांत तसेच ओदिशात भुवनेश्वर, कटक आणि केंद्रपाडा येथे भूकंपाने लोकांमध्ये घबराट पसरली होती.