उत्तर भारत आणि पाकिस्तानात बुधवारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.
गेल्या २४ एप्रिल रोजीच संपूर्ण उत्तर भारतासह पाकिस्तान, अफगाणिस्तान तीव्र स्वरुपाच्या भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला होता. त्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.७ इतकी होती. अफगाणिस्तानातील जलालाबाद इथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. त्यानंतर पुन्हा एकदा बुधवारी उत्तर भारतात कमी तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले.